अक्षर पटेलने लग्नात केला क्रिकेट डान्, व्हिडीओ व्हायरल
वडोदरा, 27 जानेवारी : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेल गुरुवारी मेहा पटेलसोबत गुजरातमध्ये लग्नबंधनात अडकला. लग्नासाठी अक्षर पटेलने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ब्रेक घेतला होता. आता तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठीही तो संघात नसेल. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एक डान्सचा व्हिडीओसुद्धा असून यातही तो क्रिकेट खेळतोय. अक्षर पटेलने मेहासोबत तेरे दिल से ना खेलूंगा या गाण्यावर डान्स केला. सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. जेव्हा हे गाणं सुरु होतं तेव्हा तेरे दिल से ना खेलूंगा ही लाइन आली तेव्हा अक्षरने बॅटिंग आणि कॅचची अॅक्शन केली. अक्षरने पहिल्यांदा षटकार मारण्याची अॅक्शन केली आणि पुन्हा कॅच घेतल्यासारखं केलं. अक्षरचा लग्नातला हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. केएल राहुलनंतर आता अक्षर पटेलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होतेय. हेही वाचा : अक्षर पटेलच्या लग्नाचे फोटो आले समोर, गुजरातमध्ये पार पडलं लग्न
अक्षर आणि मेहा यांनी गुजराती पद्धतीने लग्न केलं. अक्षरने यावेळी पारंपरिक पगडी बांधल्याचं दिसतं. मेहा पटेल एक डायटिशियन आणि न्यूट्रिशियनिस्ट आहे. मेहा सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी डाएट प्लॅन शेअर करत असते. लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे फोटो समोर आले असून यात भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनादकटसुद्धा दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रविंद्र जडेजा दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलची वर्णी संघात लागली होती. यात त्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही कमाल केलीय.