ॲडलेड, 29 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात (Aus Vs Pak) ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा सामना डे-नाईट असून गुलाबी चेंडूनं खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय सलामीच्या फलंदाजांना योग्य ठरवला. सलामीचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबशॅन यांनी पाक गोलंदाजांची शाळा घेतली. वॉर्नर आणि लॅबशॅननं यांनी पहिल्या चेंडूपासून पाकच्या गोलंदाजांवर वर्चस्व ठेवले. दरम्यान या सगळ्यात पाकच्या निष्काळजीपणाचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वॉर्नरनं शॉट लगावल्यानंतर पाकच्या फिल्डरला चेंडू दिसलाच नाही. त्यामुळं तो फक्त चेंडूकडे बघत राहिला आणि चौकार गेला. यावर गोलंदाजानं दिलेली प्रतिक्रीया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- VIDEO : मित्र झाले वैरी! पहाटे 4 वाजता पोलार्डनं उडवली रोहितची झोप या व्हिडीओमध्ये इफ्तेकार अहमद 42वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर फलंदाजी करत होता. इफ्तेकारनं टाकलेला शॉट बॉलवर 1 धावा काढण्यासाठी वॉर्नर धावला. मात्र लेग साईडला फिल्डिंग करत असलेल्या शाहीन आफ्रिदीला चेंडू दिसला नाही. जेव्हा चेंडूनं बाउंड्री पार केली तेव्हा शाहीनच्या लक्षात आले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, मीम्सही तयार केले जात आहेत. वाचा- श्रेयस अय्यरचा ‘धोनी’ अवतार! हेलिकॉप्टर शॉटचा VIDEO VIRAL
वाचा- काय म्हणावं या शॉटला? फलंदाजाची अतरंगी बॅटिंग पाहून प्रेक्षकही चक्रावले या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. वॉर्नर आणि लॅबशॅन या दोघांनी आपले शतक पूर्ण केले आहे. ऐवढेच नाही तर दोघांनी 294 धावांची भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्याविरुद्ध झालेल्या सामन्यातील ही सर्वेश्रेष्ठ भागीदारी आहे. पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर पाक संघानं दुसऱ्या सामन्यात मोठे बदल केले आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 1 विकेट गमावत 302 धावा केल्या आहेत. सध्या वॉर्नर 166 तर, लॅबशॅन 126 धावांवर खेळत आहे.