ॲडलेड, 01 डिसेंबर : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये होत असलेल्या सामन्यात वॉर्नरनं जबरदस्त फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 589 धावांचा डोंगर उभा केला. यात डेव्हिड वॉर्नरनं आपल्या आक्रमक फलंदाजीनं पहिले त्रिशतक पूर्ण केले. वॉर्नरच्या या कामगिरीमुळे आता तो ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज वॉर्नर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरनं 154 धावांची शतकी खेळी केली होती. तर, दुसऱ्या सामन्यात 335 धावांची नाबाद खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. वॉर्नरनं 418 चेंडूत 335 धावा केल्या. यात 39 चौकार आणि एका षटकारानं ही कामगिरी केली. वॉर्नरनं कसोटी क्रिकेटमध्ये 23 शतक , 2 दुहेरी शतक आणि आता एका त्रिशतकाची जोड आली आहे. वाचा- भारतीय क्रिकेटमधील पहिली डबल हॅट्रिक; पाहा VIDEO दरम्यान, आतापर्यंत एकाही फलंदाजाला ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडता आलेला नाही. मात्र वॉर्नरनं हा रेकॉर्ड कोण मोडणार असे विचारल्यावर त्यानं एका भारतीय फलंदाजाचे नाव घेतले. वॉर्नरनं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नाहीतर सलामीवीर रोहित शर्मा लाराचा 400 धावांचा रेकॉर्ड मोडू शकतो. वाचा- VIDEO : क्रिकेटच्या मैदानात खेळाडू खेळायला लागला फुटबॉल, चेंडू थेट बाउंड्री पार!
वाचा- कर्णधाराच्या निर्णयाचा आणखी एक बळी; सर्वांना आठवला राहुल द्रविड! रोहित शर्मानं सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात फलंदाजीस सुरुवात केली. यात कसोटी मालिकेत रोहितनं द्विशतकी खेळी करण्याची कामगिरी केली. यामुळे रोहित शर्मा आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये सध्या 13व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यामुळं रोहित शर्मा लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज असल्याचे मत वॉर्नरनं व्यक्त केले. वाचा- टीम इंडियाचा फलंदाज दिवसाला कमवतोय एक कोटी! दरम्यान ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात 5 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला. यात डेव्हिड वॉर्नरनं नाबाद 335, मार्नस लॅबशॅन 162 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं 3 विकेट गमावत 589 धावांवर डाव घोषित केला.