India vs Pakistan Hardik Pandya Asia Cup
दुबई, 28 ऑगस्ट : आशिया कपमध्ये (Asia Cup) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) 5 विकेटने रोमांचक विजय झाला आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. हार्दिकने पहिले 4 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 3 विकेट घेतल्या, यानंतर त्याने बॅटिंगमध्ये 17 बॉल खेळून 194.12 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 33 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. 308 दिवसांपूर्वी दुबईच्या याच मैदानात पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा पराभव केला होता. भारताने या पराभवाचा बदला आता याच मैदानात घेतला. मुख्य म्हणजे त्यावेळी हार्दिक पांड्या भारताच्या पराभवाचं कारण ठरला होता. तेव्हा व्हिलन ठरलेला पांड्या यावेळी मात्र हिरो ठरला. हार्दिकशिवाय टीम इंडियाच्या या विजयाची काही प्रमुख कारणंही ठरली. जडेजाची सिक्स 10व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट गेल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली होती, कारण विराटच्या आधी राहुल (KL Rahul) आणि रोहितही (Rohit Sharma) पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण चौथ्या क्रमांकावर खेळताना रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) त्याची रणनिती उघड केली. बॅटिंगला आल्यानंतर दुसऱ्याच बॉलला जडेजाने 98 मीटर लांब सिक्स मारला. विराट-रोहितने सांभाळलं केएल राहुल पहिल्याच बॉलला आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आक्रमक खेळ केला नाही, तर टीमला सांभाळून घेतलं. राहुल पहिल्याच बॉलला शून्यवर बोल्ड झाल्यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांसमोर पुन्हा टी-20 वर्ल्ड कपची भीती समोर उभी राहिली होती. रोहित-विराटने मात्र आणखी एक विकेट देणं टाळलं. रोहितचा आवेश खानवर विश्वास पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने आवेश खानला (Avesh Khan) बॉलिंग दिली. अनुभव नसलेल्या आवेश खानच्या हातात बॉल दिल्यामुळे कॉमेंटेटरसह अनेकांनी रोहितच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. पाकिस्ताननेही आवेशच्या पहिल्या चार बॉलमध्ये एक सिक्स आणि एक फोरसह 12 रन केले होते, पण आवेशने पाचव्याच बॉलला फखर झमानला आऊट करत कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. पंतऐवजी कार्तिक रोहित शर्माने ऋषभ पंतऐवजी (Rishabh Pant) दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) टीममध्ये संधी दिल्यामुळे सुरूवातीला अनेकांनी टीका केली, पण मॅच संपल्यानंतर रोहितचा हा निर्णय योग्य ठरला. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांना खेळवलं असतं तर रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) टीमबाहेर बसावं लागलं असतं, पण या सामन्यात जडेजाने त्याचं महत्त्व दाखवून दिलं. पहिले बॉलिंग करताना जडेजाने 2 ओव्हरमध्ये फक्त 11 रन दिले, यानंतर बॅटिंगमध्ये त्याने 29 बॉल खेळून महत्त्वपूर्ण 35 रन केले. दहानीच्या आक्रमणानंतरही डगमगली नाही टीम 128 रनवर पाकिस्तानने 9 विकेट गमावल्या होत्या, पण 11व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या दहाणीने 6 बॉलमध्ये 2 सिक्सच्या मदतीने 16 रन केले. दहानीच्या या आक्रमक बॅटिंगनंतरही टीम इंडिया डगमगली नाही. अर्शदीप सिंगने अचूक यॉर्कर टाकत दहानीला बोल्ड केलं. दहानीने अजून एखादी सिक्स मारली असती, तर शेवटच्या ओव्हरमध्ये हे आव्हान पार करणं टीम इंडियासाठी अडचणीचं ठरू शकलं असतं.