अनुष्का शर्मा-विराट कोहली
मुंबई, 6 नोव्हेंबर- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कला विश्वातील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. या दोघांचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांच्या जोडीचं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कौतुक वाटत असतं. दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची आणि एकमेकांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतंच 5 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेटर आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीने आपला वाढदिवस साजरा केला आहे. क्रिकेटरच्या वाढदिवसानिमित्त, अनुष्का शर्माने सर्वात खास आणि जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून सर्वच चकित होत आहेत. पाहूया या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, अनुष्का शर्मा पती विराट कोहलीला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला खास सरप्राईज देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ज्यामध्ये ती पूर्णपणे अपयशी ठरते. या व्हिडीओमध्ये विराट आपल्या बेडवर झोपलेला दिसून येत आहे. तर दुसरीकडे अनुष्का त्याच्यासाठी फ्रीजमधून केक काढताना दिसत आहे. केक घेतल्यानंतर अनुष्का बाजूच्या ड्रॉवरमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत असते. परंतु ड्रॉवर जाम झालेला असतो. त्यामुळे ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करत असताना अनुष्का केकसह खाली पडते आणि तिचं सरप्राईज अपयशी ठरतं. **(हे वाचा:** Alia Bhatt: नातीच्या जन्मानंतर आजी नीतू कपूरची पहिली पोस्ट; आलिया-रणबीरच्या लेकीलाबाबत म्हणाल्या… )
अनुष्का केक घेऊन खाली कोसळल्यानंतर मोठा आवाज होतो. हा आवाज ऐकून विराटही घाबरतो आणि झोपेतून उठून बसतो आणि झाडू घेऊन स्वयंपाकघरात येतो आणि पाहतो की अनुष्का केकसह खाली पडली आहे. व्हिडिओ शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहलंय,- ‘मला नेहमी वाटायचं की सरप्राईज देणं फारच सोपं काम आहे. पण या खराब इंटीरियरने माझं सगळं सरप्राईज खराब केलं. तुमच्या आयुष्यातील खास दिवसांवर खराब दर्जाच्या फिटिंगची सावलीही पडू देऊ नका’.
खरं सांगायचं झालं तर, ही एका इंटिरियर डिझायनर कंपनीची जाहिरात होती. जी या कंपनीने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त बनवली होती. अनुष्काने विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक अतिशय सुंदर पोस्ट लिहली होती. तिने आपल्या पतीचे अनेक मजेदार फोटो शेअर केले आहेत आणि वाढदिवसाची एक मजेदार पोस्टदेखील लिहिली आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं- ‘आज तुझा वाढदिवस आहे. आणि अर्थातच, मी या पोस्टसाठी तुझी सर्वोत्तम अँगलचे फोटो निवडले आहेत. मी प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक रुपात तुझ्यावर प्रेम करते’. अनुष्काची ही पोस्ट काल प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.