मुंबई, 19 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाकडून पाकिस्ताननं पराभव स्विकारल्यानंतर पाकचे चाहच्यांची चांगलीच धुलाई केली. यावर अनेक ट्विटर वॉरही झाले. कारण, भारत-पाकिस्तान सामन्याच्या आदल्या रात्री पाकिस्तानचा संघ पार्टीत मश्गुल असल्याचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये टीमसोबत शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाही दिसते होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सानियानं आपल्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करत असल्याची टीका केली होती. आता सानियानं नेटकऱ्यांना सुनावले आहे. सानियानं ट्विट करत, “ट्विटरवर तुम्हाला भन्नाट लोकं भेटत असतात. पण तुम्हाला तुमचा राग काढण्यासाठी दुसरं कोणीतरी शोधा”, असे ट्विट केले आहे.
तसेच, याआधी सानियाचा पती आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू शोएब मलिक यानं, “आम्हाला शिव्या देऊ नका आणि मुळात आमच्या घरच्यांवर राग काढण्याची काही गरज नाही. मीडियानंसुध्दा ही गोष्ट लक्षात ठेवावी”, अशी विनंती ट्विटरवरून केली आहे.
सानिया आणि वीणामध्ये रंगले होते ट्विटर वॉर याआधी सानिया आणि वीणामध्ये ट्विटर वॉर रंगले होते. या सगळ्या प्रकरणावर वीणानं, ‘‘मला तुमच्यासोबत गेलेल्या मुलांची भीती वाटत आहे. तुम्ही शीशी नाईट क्लबमध्ये तुमच्या मुलांना घेऊन गेलात ? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ज्या क्लबमध्ये गेलात तिथं जंक फुड असतं, ते खेळाडूंसाठी योग्य आहे का? तु स्वत: एक आई आणि खेळाडू आहे, तुला हे माहित पाहिजे", असे ट्विट केले. यावर भडकलेल्या सानियानं, वीणाला मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई नाही आहे, अशा शब्दात सुनावले. एवढचे नाही तर सानियानं आपल्या ट्विट करत, “वीणा, मी माझ्या मुलाला तिकडे घेऊन गेले नव्हते. मी माझ्या कुटुंबियांसोबत कुठे जायचं आणि कुठे नाही, हा निर्णय आमचा आहे. मला माझ्या मुलाची तुमच्या सर्वांपेक्षा जास्त काळजी आहे”. त्यानंतर तिनं खोचकपणे, “मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई किंवा शिक्षिका नाही”.असे सांगितेल. भारताविरुद्ध सामना हरल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली. वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण… वाचा- World Cup : गर्लफ्रेंडच्या ट्रॅपमध्ये अडकला होता हा खेळाडू, केली विक्रमी खेळी! वाचा- बुमराहने शेअर केला ‘हा’ फोटो, चाहत्यांनी विचारलं अनुपमा आहे का? SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं