JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक

असा गोलंदाज होणे नाही! 72 तासांत भारतीय गोलंदाजानं घेतली दुसरी हॅट्रिक

टीम इंडियातील युवा गोलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : टीम इंडियातील युवा गोलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. बांगलादेश विरोधात भारतीय गोलंदाजांनी टी-20 मालिका जिंकून दिली. यात दीपक चाहरची खेळी सर्वात महत्त्वपूर्ण होती. बांगलादेश विरोधात झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात चाहरनं 6 विकेट घेण्याची कामगिरी केली. यात एका विश्वविक्रमी हॅट्रिकचाही समावेश आहे. मात्र, दीपक चाहरनं पहिली हॅट्रिक घेत तिसऱ्याच दिवसात एक कमाल कामगिरी केली आहे. तीन दिवसांच्या आत चाहरनं पुन्हा एकदा हॅट्रिकघेण्याची कामगिरी केली आहे. सैयद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये राजस्थानकडून खेळताना दीपक चाहरनं ही अशी कामगिरी केली. आज दीपकनं ची-20 सामन्यात हॅट्रिक घेतली. बांगलादेश विरोधात झालेल्या तिसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. दरम्यान आज तिरुवनंतपुरम येथे विदर्भा विरोधात झालेल्या सामन्यात चाहरनं तीन चेंडूत तीन विकेट घेतल्या. या ओव्हरमध्ये दीपकनं चार विकेट घेण्याची कामगिरी केली. चाहरने नागपूरमधील सामन्यात हॅट्रिकसह 6 गडी बाद करून इतिहास रचला. त्याने 3.2 षटकांत 7 धावा देत 6 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या षटकात त्यानं हॅट्रिक पूर्ण केली. त्याने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद केला होता. त्यानंतर अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर 2 गडी बाद करून बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. वाचा- ‘किती बेशरम आहेस यार तू’, दीपक चाहरनं रेकॉर्ड मोडल्यावर भडकला चहल!

वाचा- VIDEO : अश्रूंचे झाले मोती, धोनीच्या संतापामुळे दीपक चाहर झाला डेथ ओव्हर किंग! एकाच ओव्हरमध्ये 4 फलंदाजांना केले बाद चाहरनं 13व्या ओव्हरमध्ये अशी कामगिरी केली. तिसऱ्या चेंडूवर चाहरनं विदर्भचा फलंदाज ऋषभ राथोडला बाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दर्शन नालकांडे आणि पाचव्या चेंडूवर श्रीकांत वाघ यांना बाद केले. दीपकनं या सामन्यात 3 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा देत 4 विकेट घेतल्या. वाचा- चाहरचा कहर, हॅट्ट्रिकसह केली विश्वविक्रमाची नोंद चाहरनं ऐतिहासिक हॅट्रिक घेत रचला इतिहास भारताकडून कसोटी हरभजन सिंगने पहिल्यांदा हॅट्रिक केली होती. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेतन शर्मा आणि टी20 दीपक चाहरने ही कमाल केली आहे. 2019 मध्ये तीन भारतीय गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली आहे. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरोधात अशी कामगिरी केली होती. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विंडीजविरुद्धच्या कसोटीत हॅट्रिक केली होती. दीपक चाहरने हॅट्रिक घेताच तीनही प्रकारात भारतीय गोलंदाजांनी असा कारनामा केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या