JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 2 हजारहून अधिक काडीपेटी, ओडिशाच्या मुलानं तयार केली हॉकी वर्ल्ड कपची प्रतिकृती!

2 हजारहून अधिक काडीपेटी, ओडिशाच्या मुलानं तयार केली हॉकी वर्ल्ड कपची प्रतिकृती!

ओडिशा राज्यात सलग दुसऱ्यांदा या हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा रसिकांमध्ये या स्पर्धेविषयी उत्साह पहायला मिळत असून ओडिशामधील एका युवकाने 2 हजारहून अधिक काडीपेटीच्या काड्यांपासून हॉकी वर्ल्ड कप २०२३ च्या ट्रॉफीची प्रतिकृती तयार केली आहे.

जाहिरात

हॉकी विश्वचषक स्पर्धेला शुक्रवार 13 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जानेवारी : जागतिक हॉकीमधील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला शुक्रवार 13 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. ओडिशा राज्यात सलग दुसऱ्यांदा या हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले असून आज या स्पर्धेचा उदघाटन सोहोळा पार पडणार आहे.  क्रीडा रसिकांमध्ये या स्पर्धेविषयी उत्साह पहायला मिळत असून ओडिशामधील एका 19 वर्षीय युवकाने 2 हजारहून अधिक काडीपेटीच्या काड्यांपासून हॉकी वर्ल्ड कप 2023 च्या ट्रॉफीची  प्रतिकृती तयार केली आहे. Hockey World cup replica Odisha

रंजन साहूने 2023 च्या ट्रॉफीची ही प्रतिकृती तयार केली

सास्वत रंजन साहू असे या 19 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो हॉकी खेळाचा मोठा चाहता असून त्याने यापूर्वी देखील काडीपेटीच्या पाड्यांपासून अनेक वस्तू तयार केल्या आहेत. हॉकी वर्ल्ड कप ट्रॉफीची प्रतिकृती तयार करण्यासाठी त्याने तब्बल 2 हजार 726 काड्यांचा वापर केला. साहू याने तयार केलेली ट्रॉफीची प्रतिकृती 44 सेमी उंच आणि 18 सेमी रुंद आहे. वर्ल्ड कपचे हे मॉडेल पूर्ण करण्यासाठी साहूला 13 दिवसांचा अवधी लागला. हे ही वाचा :  हॉकी वर्ल्ड कप शुक्रवारपासून; भारताचे सामने कधी, कुठे पाहता येणार? पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या सर्व सहभागी संघांना माझ्या शुभेच्छा देण्यासाठी मी ही ट्रॉफी बनवली असल्याचे साहूने सांगितले.  ओडिशाचे मुख्यमंत्री आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साहूने बनवलेले हे मॉडेल त्याने राज्य सरकारला सुपूर्द केले आहे.  हॉकी विश्वचषक स्पर्धेला भारतातील ओडिशा येथे 13 जानेवारी पासून सुरुवात होणार असून यात 16 संघानी सहभाग नोंदवला आहे.  विश्वचषकाचे सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहेत. या विश्वचषकासाठी क्रीडा प्रेमी उत्साहित असून यंदाचा विश्वचषक कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या