मुंबई, 29 डिसेंबर : मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांसाठी आराध्य दैवत आहे. मुंबई तील कानाकोपऱ्यातील हजारो भाविक दररोज श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. त्या सोबतच नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी ही अनेक भाविकांची इच्छा असते. त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. अशावेळी भाविकांची गर्दी होते. यावर उपाय म्हणून प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीला भाविकांसाठी मंदिर पहाटे उघडणार आहे. किती वाजता खुलणार मंदिर? नववर्षदिनी 1 जानेवारीला भाविकांना प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाचे दर्शन पहाटे 3.15 पासून घेता येणार आहे. पहाटे 5.30 वाजता आरती होईल. नववर्ष तसेच रविवार असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी सिद्धिविनायक दर्शनासाठी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या नियोजनासाठी रांगेचीही विशेष व्यवस्था करणात आली आहे.
Mumbai : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल धावणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
क्यू आर कोडशिवाय भाविकांना पूर्वीप्रमाणे दर्शन घेता येणार तसंच, क्यू आर कोडशिवाय भाविकांना पूर्वीप्रमाणे दर्शन घेता येणार आहे. रात्री 11.50 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी माघ गणेश जयंतीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात आलं आहे. यामुळं 14 डिसेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत मंदिर बंद होतं. मात्र, आता 19 डिसेंबरपासून मंदिर भविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. मंदिर पूर्ण पत्ता सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी,मुंबई,महाराष्ट्र