JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सव, दर्शनासाठी भाविकांची गर्दी,Video

सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सव, दर्शनासाठी भाविकांची गर्दी,Video

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 5 जानेवारी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवी मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शाकंभरी उत्सवानिमित्त भगवतीच्या मंदिरात सहस्रचंडी महायाग, तसेच भगवतीच्या महापूजेबरोबरच पंचांग कर्म पूजन, देवता स्थापन, अग्निस्थापन, नवग्रह हवन पूजन, सहस्रार्चन या पूजाविधीचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवसांत पंचदिनात्मक सहस्रचंडी महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य सत्रामध्ये महायज्ञ व होमहवन, धार्मिक विधी होणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रतिमा प्राणप्रतिष्ठा, पूजन स्थापन, सूर्यादी, नवग्रह, विश्व कल्याणासाठी पंचदिनात्मक सहस्रचंडी महायाग होत आहे. 6 जानेवारीला पौर्णिमेच्या दिवशी उत्सवाची प्रात: पूजन यथाशक्ती पूजन, उत्तरांग पूजा, होम, नवाहुती, बलिदान व महायज्ञ, पूर्णाहुती व भाविकांना महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम ट्रस्टच्या भोजनालयात आयोजित केला असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.

भाविकांनी शाकंभरी नवरात्रोत्सवाचा लाभ घ्यावा दरवर्षी भाविक शाकंभरी उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र यंदा भाविकांमध्ये अधिक उत्सुकता आहे. कारण भगवतीच्या मूळ रूपाचे दर्शन भाविकांना होत आहे. गर्दी मध्ये भाविकांनी स्वतःची काळजी घ्यावी, लहान मुलांना व्यवस्थित सांभाळावे असे आवाहन सप्तशृंगी देवी संस्थांन कडून करण्यात आले आहे. कुठे आहे मंदिर? नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी गड आहे. खाजगी वाहनाने किंवा सरकारी बसने तिथपर्यंत पोहचू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या