JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Rishi Panchami Vrat 2022: ऋषिपंचमीच्या दिवशी करा सात ऋषींची पूजा, समजून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

Rishi Panchami Vrat 2022: ऋषिपंचमीच्या दिवशी करा सात ऋषींची पूजा, समजून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

Rishi Panchami Vrat 2022: हिंदू धर्मात ऋषिपंचमीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. सप्तऋषींच्या पूजेसाठी दुपारची वेळ शुभ असल्याचं मानलं गेलं आहे. 1 सप्टेंबरला भाद्रपद शुक्ल पक्षातली पंचमी तिथी आणि गुरुवारचा दिवस असा शुभ योग आहे.

जाहिरात

Rishi Panchami Vrat 2022: ऋषिपंचमीच्या दिवशी करा सात ऋषींची पूजा, समजून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 ऑगस्ट: श्रावण महिना नुकताच संपला. पण श्रावणापासूनच सणासुदीचा व व्रतवैकल्याचा सुरू झालेला काळ दिवाळीपर्यंत सुरू राहतो. हिंदू पंचांगानुसार, (Hindu Panchang) अनेक महत्त्वाचं दिवस आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऋषिपंचमी. या वर्षी 1 सप्टेंबरला ऋषिपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवसांमध्ये सात ऋषींची पूजा केली जाते. विशेषत: महिला हे व्रत करतात. हिंदू धर्मात (Hindu Religion) ऋषिपंचमीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. सप्तऋषींच्या पूजेसाठी दुपारची वेळ शुभ असल्याचं मानलं गेलं आहे. 1 सप्टेंबरला भाद्रपद शुक्ल पक्षातली पंचमी (Bhadrapad Shukla Panchami) तिथी आणि गुरुवारचा दिवस असा शुभ योग आहे. पंचमी तिथीची सुरूवात 31 ऑगस्टला रात्री 3 वाजून 22 मिनिटांनी होईल. त्यामुळे दुपारी 2 वाजून 49 मिनिटांच्या आधी ऋषिपंचमीची पूजा केली पाहिजे. अशी करा ऋषिपंचमीची पूजा- ऋषिपंचमीच्या दिवशी दुपारी सप्त ऋषी (Seven Sages) म्हणजे मरिची, वसिष्ठ, अंगिरा, अत्री, पुलत्स्य, पुलह आणि क्रतु: यांची पूजा केली जाते. हे व्रत करणाऱ्या महिलांनी सूर्योदयाच्या वेळी घराची पूर्ण स्वच्छता करावी व स्नान करून नवीन वस्त्र परिधान करावी. त्यानंतर देवघरात आसनावर बसून हळद, कुंकवाचं चौकोनी मंडलं तयार करावं. यानंतर सप्त ऋषींची स्थापना करावी. त्यानंतर पंचामृत व गंगाजल (Gangajal) शिंपडावं. यावर चंदनाचा टिळा लावून फुलमाळा व वस्त्र, जानवं अर्पण करावं. पूजा पूर्ण झाल्यानंतर सप्तऋषींना फळ आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर दिवा लावून आरती करावी व सप्तऋषींच्या पूजा मंत्रांचा जप करावा. ऋषिपंचमीसाठी शुभ मुहूर्त- ऋषिपंचमीच्या तिथीचा प्रारंभ 31 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 03 वाजून 22 वाजता असेल. ऋषिपंचमी तिथीची समाप्ती 1 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजून 49 मिनिटांनी होईल. पूजेचा मुहूर्त 1 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 37 मिनिटांपर्यंत असेल. हेही वाचा-  Ganesh Chaturthi 2022: गणरायाच्या आगमनाने ‘या’ राशींच्या व्यक्तींचं पालटणार नशीब, आयुष्यात होणार भरभराट सप्तर्षी पूजन मंत्र- कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः। जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥ दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः॥ हा सप्तर्षी पूजन मंत्र आहे. ऋषिपंचमीचं व्रत करताना उपास करायचा असतो पण तुम्ही फळं खाऊ शकता. हिंदू धर्मशास्त्रांत ऋषिपंचमीच्या व्रताचं खूप महत्त्व सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मात मासिक पाळीच्या वेळी (Menstrual Cycle) महिलांना घरातील एखादं पवित्र कार्य करण्यास मनाई असते. पण समजा महिला देवघर स्वच्च करताना किंवा पवित्र कार्य करतानाच जर तिला पाळी आली तर तिला अपराधी वाटतं. वर्षभरात चुकून असं घडलं असेल तर त्या महिलेला पापक्षालन करण्यासाठी ऋषीपंचमी हा एकच दिवस असल्याचं मानलं गेलं आहे. त्या महिलेने सप्तर्षींची पूजा आणि हे व्रत केल्याने तिचं पापहरण होतं असं मानलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या