JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / मुलांसारखे निरागस असतात G अध्याक्षराचे लोक; परिस्थितीशी जुळवून घेण्याचा खास गुण

मुलांसारखे निरागस असतात G अध्याक्षराचे लोक; परिस्थितीशी जुळवून घेण्याचा खास गुण

हे लोक खऱ्या मनाचे असतात. त्यांच्या हृदयात कोणाबद्दल वाईट नसते, म्हणूनच ते कधीकधी तोंडावर लोकांना कडू बोलतात. या स्वभावामुळे काही लोक अशा लोकांना स्पष्टवक्तेही मानतात.

जाहिरात

G अक्षराने नावाची सुरुवात होणारे लोक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जानेवारी : ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्याबद्दल बरेच काही सांगते. ज्योतिषशास्त्र मानतं की, एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्यातील घडामोडीही कळू शकतात. इंग्रजी अक्षरे A ते Z पर्यंत नावे असलेल्या लोकांची स्वतःची वैशिष्ट्ये भिन्न असतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या आयुष्यावर वेगळा प्रभाव टाकते. या एपिसोडमध्ये आज भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा आपल्याला G अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या लोकांबद्दल सांगणार आहेत. स्वभाव कसा असतो - ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव इंग्रजीतील G अक्षराने सुरू होते, त्यांचा स्वभाव जणू लहान मुलांसारखा असतो, असे म्हणू शकतो. म्हणजे त्यांच्यात मुलांसारखी निरागसता असते. हे लोक खऱ्या मनाचे असतात. त्यांच्या हृदयात कोणाबद्दल वाईट नसते, म्हणूनच ते कधीकधी तोंडावर लोकांना कडू बोलतात. या स्वभावामुळे काही लोक अशा लोकांना स्पष्टवक्तेही मानतात. त्यांच्या भोळेपणामुळे ते अनेक वेळा इतर लोकांच्या जाळ्यात अडकतात. तथापि, फसवणूक झाल्यानंतर, ते पुन्हा ती चूक करत नाहीत आणि त्यांच्या मागील जीवनातून धडा घेत पुढे जातात.

जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात - इंग्रजी अक्षर G ने नावाची सुरुवात होणारे लोक त्यांच्या जोडीदाराशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात आणि त्यांच्या जीवनसाथीकडूनही अशीच अपेक्षा करतात. या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. त्यांच्या निरागसतेमुळे हे लोक इतरांना पटकन त्यांच्याकडे आकर्षित करतात. हे लोक एखादे काम करण्यासाठी पूर्ण योजना बनवतात, मगच ते सुरू करतात. हे वाचा -  सकाळी उठल्याबरोबर या एका मंत्राचा करा जप; दिवसभरातील कामांवर पहाल परिणाम परिस्थितीनुसार जुळवून घेतात - ज्योतिषशास्त्रानुसार, इंग्रजी अक्षर G ने नावाची सुरुवात होणारे लोक सर्व प्रकारच्या परिस्थितीशी जुळवून घेतात. परिस्थिती कितीही विचित्र असली तरी हे लोक अजिबात विचलित होत नाहीत आणि त्या विचित्र प्रसंगांना खंबीरपणे सामोरे जातात. हे लोक इतरांनाही मोकळ्या मनाने मदत करतात. हे लोक आयुष्यात झालेल्या चुकांमधून बोध घेऊन पुढे जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या