नाशिक 6 डिसेंबर : पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच नाशिकला ओळखले जाते. नाशिक मध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. त्यापैकीच प्रति गाणगापुर म्हणून ओळख असलेले श्री एकमुखी दत्त मंदिर नाशिकमध्ये आहे. शेकडो नाशिककरांच श्रध्दास्थान हे मंदिर आहे. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. गोदावरीच्या किनारी हे मंदिर वसलेलं आहे. सध्या या श्री एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सुरू आहे. कशी झाली मंदिराची निर्मिती? नाशिकमधील सदगुरु बर्वे महाराज हे दत्त भक्त होते. त्यांची दत्त भगवंतावर अपार श्रद्धा होती. ते उपासक होते. एकदा त्यांना स्वप्नात दत्त भगवंतांचा दृष्टांत झाला आणि ते गोदावरीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांच्या हातात शालूकामय मूर्ती आली. त्यांनी त्या मूर्तीची स्थापना गोदावरी किनारी असलेल्या एका मठात केली. कालांतराने त्याच भव्य मंदिरात रूपांतर झाले आणि शेकडो भाविक दर्शनासाठी येऊ लागले. अनेक भाविकांनी आपल्या इच्छा अपेक्षा श्री दत्त भगवंता समोर मांडल्या आणि त्या पूर्ण झाल्या म्हणून अनेक भाविक दररोज श्रध्देने दर्शनासाठी येत असतात. हे ऐतिहासिक मंदिर 350 वर्षांपूर्वीचे जुने मंदिर आहे, अशी माहिती मंदिरातील पुजारी मयुरेश यांनी दिली आहे.
Datta Jayanti : शेकडो वर्षांचा इतिहास असणारं बीडमधील पहिलं दत्त मंदिर, पाहा Video
आमच्या संपूर्ण कुटुंबाची अपार श्रद्धा मी गेल्या 30 वर्षांपासून न चुकता श्री एकमुखी दत्त मंदिरात दर्शनासाठी येत असतो. आमच्या संपूर्ण कुटुंबाची अपार श्रद्धा आहे. दरवर्षी दत्त जयंती उत्सव थाटामाात साजरा होत असतो. शेकडो भाविक इथं येत असतात. संपूर्ण उत्सव काळात अन्न दान केले जाते, अशी प्रतिक्रिया भाविक कुमार कडेकर यांनी दिली आहे. दत्त जयंती उत्सव सुरू दरवर्षी दत्त जयंती उत्सव हा साजरा केला जातो. विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या ही वर्षी अनेक कार्यक्रम आहेत. भजन,पारायण, धार्मीक गाणे होणार आहेत. सकाळ - सायंकाळ,दोन्ही वेळेत धार्मिक कार्यक्रम होत असतात. मंदिराच्या आवारात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सोहळ्यात लघुरुद्राभिषेक, गुरुचरित्र पारायण सुरू आहे, असंही पुजारी मयुरेश यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार
श्री एकमुखी दत्त मंदिर पूर्ण पत्ता 2Q5R+25J, गंगा घाट, रविवार पेठ, नाशिक, महाराष्ट्र 422001