JOIN US
मराठी बातम्या / पुणे / सायबर कॅफेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुण्यातील तरुणीसोबत घडलं विपरीत; रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

सायबर कॅफेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुण्यातील तरुणीसोबत घडलं विपरीत; रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा हडपसर येथील रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याची (Dead body found on railway track) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

प्रतिमा भास्कर कुटगे असं 22 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 23 सप्टेंबर: पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा हडपसर येथील रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याची (Dead body found on railway track) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणी काही कामानिमित्त सायबर कॅफेत जाण्यासाठी घराबाहेर (went for cyber cafe) पडली होती, पण ती नंतर परतलीच नाही. पण रात्रीच्या सुमारास हडपसर परिसरातील रेल्वे रुळावर तिचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत. प्रतिमा भास्कर कुटगे असं 22 वर्षीय मृत तरुणीचं नाव असून ती मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर वसाहतीतील रहिवासी आहे. मृत प्रतिमा सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर पडली होती. सायबर कॅफेत काहीतरी काम असल्याचं तिने आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं. पण सायंकाळी थेट मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. प्रतिमाने आत्महत्या केली की तिचा अपघात झाला, किंवा तिच्यासोबत काही घातपात घडला, याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही. पोलीस मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहे. हेही वाचा- अल्पवयीन मुलीला पळवून नेताना दिल्लीचे 2 ‘आशिक’ जेरबंद; नागपुरातील फिल्मी स्टोरी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रतिमा सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. पण सायंकाळी उशीरापर्यंत तिच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नातेवाईकांची चिंता वाढली. त्यानंतर प्रतिमाच्या नातेवाईकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा धाव घेत, प्रतिमा बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. हेही वाचा- ‘मानसिक आजार दूर करण्यासाठी SEX करावं लागेल’, YOUTUBE डॉक्टरकडून अजब उपचार नातेवाईकांच्या तक्रारीनुसार मार्केट यार्ड पोलीस प्रतिमाचा शोध घेत होते. दरम्यान, हडपसर येथील रेल्वे रुळावर एक तरुणी मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित तरुणीचं वर्णन प्रतिमाशी हुबेहुब जुळत होतं. नातेवाईकांनी संबंधित मृतदेह पाहिला असता तो मृतदेह प्रतिमाचाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रतिमाच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या