JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुढे जाण्यास साईड न दिल्यानं एसटी चालकाला मारहाण; महिला कंडक्टरला नेलं फरफटत

पुढे जाण्यास साईड न दिल्यानं एसटी चालकाला मारहाण; महिला कंडक्टरला नेलं फरफटत

पुणे-नाशिक महामार्गावर (Pune nashik highway) पुढे जाण्यास बाजू न दिल्यानं एका कारचालकानं एसटी चालकाला मारहाण (ST driver beaten by car driver) केल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजगुरुनगर, 24 जून: पुणे-नाशिक महामार्गावर (Pune nashik highway) पुढे जाण्यास बाजू न दिल्यानं एका कारचालकानं एसटी चालकाला मारहाण (ST driver beaten by car driver) केल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे तर आरोपी कारचालकानं महिला वाहकाला कारसोबत 100 फुटांपर्यत फरफटतही नेलं आहे. याप्रकरणी एसटी बस चालक सदु किसन भालेराव यांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांना आरोपी कारचालकाविषयी कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित एसटी राजगुरुनगर आगाराची असून पुणे -नाशिक महामार्गावरून मंचरच्या दिशेनं जात होती. दरम्यान तुकाईभांबुरवाडी याठिकाणी पाठीमागून येणाऱ्या एका व्यक्तीनं एसटीला ओव्हर टेक करत कार बसच्या आडवी उभी केली. यानंतर आरोपीनं कारमधून लाकडी काठी काढून एसटीची समोरील काच फोडली. चालकच्या बाजूचा दरवाजा उघडून एसटी चालक सदु भालेराव यांना मारहाण केली. यावेळी एसटी बसच्या कंडक्टर सारिका चिंचपुरे यांनी संबंधित कार चालकास समजावण्याचा प्रयत्न केला. ‘आम्ही ऑन ड्युटी आहोत. आमच्याशी असं वर्तन करू नका. अशा शब्दांत चिंचपुरे यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीनं काहीही ऐकून न घेता, ‘मला साईड का दिली नाही, मला एक मर्डर करण्याचा आधिकार आहे. मी तुमच्या तुमच्याकडं बघून घेतो. मी कोण आहे ते तुम्हाला दाखवतो ’’ अशी धमकी दिली. हेही वाचा- घरकुलाच्या लाभात डल्ला मारणाऱ्यांना अद्दल; उपसरपंचासह तिघे ACB च्या जाळ्यात यानंतर आरोपी घटनास्थळावरून कारमध्ये बसून निघून जाऊ लागला. यावेळी एसटी वाहक चिंचपुरे यांनी आमचे वरिष्ठ अधिकारी येत आहेत, तोपर्यंत थांबण्याची विनंती केली. पण तो न थांबता निघून जाऊ लागला. त्यामुळे वाहक चिंचपुरे यांनी कारचा समोरील एक वायपर धरण्याचा प्रयत्न केला. तरीही आरोपीनं कार थांबवली नाही. आरोपीनं चिंचपुरे यांना जवळपास 100 फुटांपर्यंत परफटत नेलं. दरम्यान दुसऱ्या गाडीतील लोकं मोठ्यानं ओरडल्यानं त्यानं कार थांबवली. यानंतर आरोपी मंचरच्या दिशेनं निघून गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या