JOIN US
मराठी बातम्या / पुणे / धनुष्यबाणाच्या निर्णयावर शरद पवार संतापले; दोन शब्दात विषय संपवला

धनुष्यबाणाच्या निर्णयावर शरद पवार संतापले; दोन शब्दात विषय संपवला

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे गटात उत्साह असून, ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जाहिरात

शरद पवार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे पक्ष आणि चिन्हा मिळाल्यामुळे शिंदे गटात उत्साह आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याच्या पहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ओपन जीपमधून मातोश्रीबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या विषयावर पुन्हा बोलणं टाळलं. मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं  शरद पवार यांनी?  सध्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राज्याचं वातावरण चांगलच तापलं आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी या वादावर पुन्हा प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही, मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  अमित शाह गिरीश बापटांच्या भेटीला; मुलाने दिली हेल्थ अपडेट अमित शाहांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया   दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सहकार परिषदेच्या समारंभासाठी शाह पुण्यात आले होते. सहकार परिषदेचं उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे योग्य वाटल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या