JOIN US
मराठी बातम्या / पुणे / जबरी दरोड्यातील फरार आरोपी 41 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात; सापळा रचून केली उचलबांगडी

जबरी दरोड्यातील फरार आरोपी 41 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात; सापळा रचून केली उचलबांगडी

Crime in Pune: 1980 साली जबरी दरोडा (Robbery in 1980) टाकून रोकडं आणि दागिने घेऊन (robbed money and ornaments) पळालेल्या आरोपीला पोलिसांनी तब्बल 41 वर्षांनी अटक (Accused arrest after 41 years) केली आहे.

जाहिरात

अंकुश माणिक गायकवाड असं अटक केलेल्या 58 वर्षीय आरोपीचं नाव आहे. (फोटो- लोकमत)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लोणी काळभोर, 17 सप्टेंबर: ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है’ अशी एक हिंदीत म्हण आहे. खरंच कायद्याचे हात किती लांब असू शकतात याचा प्रत्यय नुकताच एका घटनेता आला आहे. 1980 साली जबरी दरोडा (Robbery in 1980) टाकून रोकड आणि दागिने घेऊन (robbed money and ornaments) पळालेल्या आरोपीला पोलिसांनी तब्बल 41 वर्षांनी अटक (Accused arrest after 41 years) केली आहे. आरोपीनं मागील बऱ्याच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा दिला होता. त्यानंतर आता पोलिसांनी अत्यंत शिताफीनं सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अंकुश माणिक गायकवाड असं अटक केलेल्या 58 वर्षीय आरोपीचं नाव असून तो सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील खडकी येथील रहिवासी आहे. आरोपी गायकवाडने आपल्या अन्य आठ साथीदारांच्या मदतीनं दौंडजवळील यवत येथे जबरी दरोडा टाकला होता. हा गुन्ह केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. पण यातील सहा आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. पण आरोपी गायकवाडसह तिघेजण मागील 41 वर्षांपासून फरार होते. हेही वाचा- मित्रानेच तोडले हात-पाय, शिरही केलं धडावेगळं, मुंबईतील थरारक घटनेचं उलगडलं गूढ दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अलीकडेच जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलिसांनी जुन्या रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा फरार आरोपी गायकवाड हा करमाळा खडकी रोडवर जनावरं चारायला गेला असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. हेही वाचा- मुलाच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका; 10 दिवसात आलिशान घर सोडण्याचे आदेश या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जावून सापळा रचला आणि आरोपी अंकुश गायकवाड याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपी अंकुश याने 1980 साली यवत याठिकाणी दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या