JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पिंपरी चिंचवडमध्ये गुंडाचा हैदौस सुरूच, 8 ते 9 वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवडमध्ये गुंडाचा हैदौस सुरूच, 8 ते 9 वाहनांची तोडफोड

Vehicle vandalism continues in Pune Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 12 ऑगस्ट : पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात वाहनांची सुरू असलेली तोडफोडीचं सत्र काही थांबताना दिसत नाहीये (Vehicle vandalise continue). आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमधील निगडी (Nigadi) परिसरात आठ ते नऊ वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निगडी परिसरातील वाहतूक नगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास निगडी परिसरात अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली. आरोपींच्या हातात कोयते, लाकडी दांडके होते आणि त्याचा धाक दाखवत त्यांनी वाहनांची तोडफोड केली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. आरोपींनी कोयता, लाकडी दांडक्याने टेम्पो, ट्रकच्या काचा फोडल्या. या घटनेत अंदाजे 50000 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. आरोपी अशा प्रकारे कृत्य करुन परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये लोखंडी रॉडने मारुन मॅनेजरची हत्या पिंपरी -चिंचवडच्या चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नानेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीचा मॅनेजर अमोल गजानन राणे याची हत्या झाली आहे. अनैतिक विवाह बाह्य संबंधातून झाल्याच स्पष्ट झालं आहे. अमोल राणे याच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून ते फूटेज पोलिसांच्या हाती लागेल आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे की, भवानी इंडस्ट्रीतील कामगार रामेश्वर वामन पवार हा अमोल राणे याला लोखंडी रॉडणे मारत आहे. आरोपी रामेश्वर पवार याच्या बायकोचे अमोल राणे यांच्याशी अनैतिक विवाह बाह्य संबध आसल्याचा संशय रामेश्वर पवार याला होता. याच संशयातून रामेश्वर पवार याने अमोल राणे याचा लोखंडी रॉडने मारून खून केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या