JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Coronavirus : दिलासादायक बातमी; 8 महिन्यांनंतर पुण्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

Coronavirus : दिलासादायक बातमी; 8 महिन्यांनंतर पुण्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

मुरलीधर मोहोळ यांनी लिहिलं, की पुण्यात आज एकाही कोरोनाबाधित व्यक्तीची नोंद झालेली नाही. पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 21 ऑक्टोबर : कोरोना काळात हॉटस्पॉट (Corona Hotspot) समजल्या जाणाऱ्या पुण्यातून (Coronavirus in Pune) बुधवारी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी जवळपास आठ महिन्यांनी पुण्यात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही (Pune Records Zero Covid-19 Deaths). म्हणजेच बुधवारी पुण्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना लसीकरण विक्रमाआधी आली चिंताजनक बातमी; मोदी सरकारने केला मोठा खुलासा मुरलीधर मोहोळ यांनी लिहिलं, की पुण्यात आज एकाही कोरोनाबाधित व्यक्तीची नोंद झालेली नाही. पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे. सोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्याही आता नियंत्रणात आली आहे. आज महापालिका क्षेत्रात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 6 फेब्रुवारी 2021 नंतर ही दिलासादायक बातमी पहिल्यांदाच मिळाली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (2nd Wave of Coronavirus) कहर कमी होताना दिसत आहे. दररोज कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. तर, कोरोनातून बरं होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. अशातच आता पुण्यात बुधवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्यानं आणखीच दिलासा मिळाला आहे. परदेशी प्रवाशांना भारतात RT-PCR टेस्ट बंधनकारक, एक लस घेतलेल्यांना विलगीकरण कोरोना महामारीचा प्रसार झाल्यापासून रविवारी मुंबईतही पहिल्यांदाच असं झालं होतं, की एकही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. मुंबईनंतर आता अशीच दिलासादायक बातमी पुण्यातून समोर आली आहे. ही बातमी यासाठीही दिलासादायक आहे, कारण दुसऱ्या लाटेत या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाने अक्षऱशः हाहाकार घातला होता. या दोन शहरांमध्ये दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्याही भयावह होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या