cपुणे, 30 मे: पुण्यात पोलिसांनी डान्स बार (Dance Bar) वर मोठी कारवाई केली आहे. भोर तालुक्यातल्या केळवडे गावात एका फार्महाऊसवर दिवसाढवळ्या डान्सबार होता. या डान्सबार पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. पुणे (Pune) सातारा हायवेजवळच्या फार्महाऊसवर पोलिसांनी छापा मारला. पुण्यातल्या ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी बारगर्ल यांच्यासह आरोपींना ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे मुंबई ठाण्यातल्या मुलींना खासगी फार्महाऊसवर आणून आरोपींचा धांगडधिंगाणा सुरु होता. डान्स पार्टीतील लोकं पुण्यातील रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे. हेही वाचा- मोठी बातमी: मेहुल चोक्सीचा डोमिनिकाच्या तुरुंगातला EXCLUSIVE फोटो या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.