JOIN US
मराठी बातम्या / पुणे / आरोपीच्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; पुण्यात पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार

आरोपीच्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; पुण्यात पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार

Rape in Pune: पुण्यातील एका 25 वर्षीय तरुणीवर PSI पदावरील पोलीस अधिकाऱ्याने लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर वारंवार बलात्कार (PSI Raped 25 years old woman) केला आहे.

जाहिरात

प्रवीण नागेश जर्दे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. (File Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 02 ऑक्टोबर: पुण्यातील कोथरूड परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 25 वर्षीय तरुणीवर PSI पदावरील पोलीस अधिकाऱ्याने लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर वारंवार बलात्कार (PSI Raped 25 years old woman) केला आहे. आरोपीनं आपलं पहिलं लग्न लपवून ठेवून फिर्यादीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रवीण नागेश जर्दे (Pravin Nagesh Jarde) असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. संशयित आरोपी जर्दे हा सध्या येरवडा पोलीस वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला पुणे शहर आणि आसपासच्या विविध ठिकाणी नेत जबरदस्तीने अनेकदा बलात्कार केला आहे. पीडित तरुणीनं आरोपीकडे लग्नाची मागणी केल्यानंतर टाळाटाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हेही वाचा- जादुटोणाचे निष्पाप बळी, 7 वर्षाच्या मुलाचा कापला प्रायव्हेट पार्ट संशयित आरोपी प्रवीण जर्दे याची 2018 साली पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. मे 2020 मध्ये एका गुन्ह्याचा तपास करत असताना, एका आरोपीच्या बहिणीसोबत जर्दे याची ओळख झाली होती. आरोपीनं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवत फिर्यादीशी ओळख वाढवली. तसेच तिला लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर अनेकदा बलात्कार केला आहे. हेही वाचा- पतीच्या निधनानंतर 8 दिवसात हरली हिंमत, विवाहितेनं चिमुकलीसह केला हृदयद्रावक शेवट दरम्यान पीडित तरुणीने आरोपी पोलीस अधिकाऱ्याकडे लग्नाची मागणी केली असता, तो टाळाटाळ करू लागला. तसेच तिला मारण्याची धमकी दिली. आपण पोलीस अधिकारी असून तुझे तुकडे- तुकडे करून तुला संपवून टाकेल, माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. अशी धमकी देत आरोपीनं पीडितेलं मारहाण केल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या