JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला विश्वासघात

पुण्यातील IT अभियंत्याकडून उच्च शिक्षित तरुणीला दगा; लॉजवर बोलावून केला विश्वासघात

Rape in Nagpur: पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने नागपुरातील एका उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 18 ऑक्टोबर: पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने नागपुरातील एका उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर बलात्कार (Rape in Nagpur) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिला एका नागपुरातील एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. याठिकाणी आरोपीनं पीडितेवर दोन दिवस अत्याचार केल्यानंतर, पुण्याला निघून आला आहे. यावेळी आरोपीनं एका धार्मिक ठिकाणी जाऊन पीडित मुलीशी लग्न देखील उरकून घेतलं होतं. याप्रकरणी पीडित तरुणीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गौरव जगनानी असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर 28 वर्षीय पीडित तरुणी नागपुरातील उच्चभ्रू कुंटुबातील असून ती खाजगी कंपनीत नोकरी करते. आरोपी गौरव आणि पीडित तरुणीची मेट्रिमोनियल साइटवरून ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी देखील केली होती. जवळपास लग्न पक्क ठरलं होतं. दरम्यान आरोपी गौरवने लग्नासाठी किती खर्च करणार अशी विचारणा केली. हेही वाचा- गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार यावेळी कुटुंबीयांनी 15 ते 20 लाख रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली. पण गौरवच्या कुटुंबीयांनी किमान 40 लाख रुपये खर्च करण्याची अट घातली यावरून हे लग्न मोडलं. दरम्यान आरोपी गौरवने तरुणीशी संपर्क साधून ‘मला तुझ्याशीच लग्न करायचंय’ असं सांगितलं. त्यासाठी तो नागपुरात देखील आला. याठिकाणी आल्यानंतर आरोपीनं पीडितेला सीताबर्डी येथील हॉटेल आदित्यमध्ये बोलावलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून दोन दिवस शारीरिक संबंध ठेवले. हेही वाचा- दसऱ्याच्या दिवशीच एकुलता एक मुलगा बनला राक्षस; आईसोबतच्या कृत्यानं पुणे हादरलं! यानंतर आरोपीनं एका धार्मिक ठिकाणी जाऊन पीडितेशी लग्न केलं. तसेच आपण लवकरच परत येतो, असं सांगून आरोपी पुण्याला निघून गेला. यावेळी पीडितेनं सोबत येण्याचा तगादा लावला होता. पण आरोपी तिला घेऊन पुण्याला गेला नाही, याउलट पुण्याला गेल्यानंतर त्याने पीडित तरुणीला एक नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये त्याने बळजबरीने लग्न लावल्याचा आरोपी केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या