पुणे, 8 जुलै : पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये (Bharti Vidyapeeth Campus Pune) राहणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे (hidden camera in toilet and bathroom) आढळले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा प्रकार नेमका कोण केलाय का केलाय याबाबत फिर्यादी महिलेला कुठलीच माहिती नसल्याचं तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार डॉक्टर भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात असणाऱ्या डॉक्टर्स कॉर्टरमध्ये राहतात. सहा जुलै रोजी त्या सकाळी 8:80 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांना घरातील वातावरण संशयास्पद वाटले. त्यांनी घरातील कानाकोपऱ्यात अशी पाहणी केली असता त्यांना लाल लाईट चमकत असल्याचे आढळले. प्लॅटफॉर्मवरुन दागिन्यांनी भरलेली बॅग चोरी; 24 तासांत पोलिसांनी आवळल्या बाब्याच्या मुसक्या यानंतर त्यांनी अधिक पाहणी केली असता त्यांना बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या धास्तावल्या. या संबंधित प्रकार मैत्रिणींना सांगितल्यावर या प्रकाराचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. त्या घरी नसताना त्यांच्या परस्पर कोणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे हिशोबाने घरात समजून येणार नाही. अशा पद्धतीने स्पाय कॅमेरे लावल्याचं त्यांच्या लक्षात आलं. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र अशा पद्धतीने एक महिला डॉक्टर डॉक्टरच्या घरी अज्ञात इसमाने बनावट चावीच्या सहाय्याने लॉक उघडून आतमध्ये प्रवेश करून त्यांचे बाथरूम, बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले. त्यानंतर हळू दरवाजा लावून घरातल्या सगळ्या गोष्टी आहेत अशा ठेवून निघून गेला. मात्र जेव्हा ही महिला डॉक्टर आपल्या कामावरून घरी परत आली तेव्हा त्यांना घरात काही गोष्टीत संशयास्पद वाटल्यास आणि हा प्रकार उघडकीस आला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.