JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीकडून बॉयफ्रेंडची गळा दाबून हत्या

पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीकडून बॉयफ्रेंडची गळा दाबून हत्या

Pune Crime News: धक्कादायक म्हणजे आरोपी गर्लफ्रेंड स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 09 सप्टेंबर: पुण्यात (Pune Crime) गर्लफ्रेंडनेच (Girlfriend) आपल्या बॉयफ्रेंडची (Boyfriend) हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी गर्लफ्रेंड स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. रागात तिनं बॉयफ्रेंडचा गळा दाबून हत्या केली. सतत किरकोळ गोष्टीवरुन होणाऱ्या वादात तिनं रागाच्या भरात हे टोकाचं पाऊल उचललं. पुण्यातल्या भेकराईनगरमध्ये ही घटना घडली आहे. 34 वर्षीय सोनल पुरुषोत्तम दाभाडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तर रोहिणी रामदास युनाते असं आरोपी तरुणीचं नाव आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघे तरुण- तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कंधार हायजॅकच्या मास्टरमाईंडचा मुलगा अफगाणिस्तानचा संरक्षण मंत्री   ही घटना 29 ऑगस्टला हिंद कॉलनी येथे राहत्या घरात घडली. सुरुवातीला या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र पोलीस तपास आणि शवविच्छेनाचा अहवाल समोर आल्यानंतर तरुणीनं हत्या केली असल्याचा उलगडा झाला. बुधवारी संबंधित तरुणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याता आला असून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. 29 ऑगस्टला सोनलसोबत रोहिणीचा वाद झाला. त्यामुळे रागात रोहिणीनं सोनलला ढकलल त्यात तो भिंतीवर आपटला. त्यानंतर तिनं रागाच्या भरता त्याचा गळा दाबला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या