JOIN US
मराठी बातम्या / पुणे / सामनाच्या अग्रलेखातून आंबिल ओढा वादावरुन पुणे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

सामनाच्या अग्रलेखातून आंबिल ओढा वादावरुन पुणे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

Saamana Editorial: पुण्यात आंबिल ओढ्यालगत असणाऱ्या घरांवर बुलडोझर चालवला गेला. सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial)भाष्य करण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 25 जून: पुण्यातील (Pune) आंबिलओढा (Ambil Odha slum) परिसरातील अतिक्रमण असणारी घरं हटवण्यासाठी गुरुवारी पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह पोकलनही आणण्यात आला होता. ओढ्यालगत असणाऱ्या घरांवर बुलडोझर चालवला गेला. यावेळी रहिवाशांना घरातून बाहेर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी पोलीस आणि रहिवाशांमध्ये एकच झटापट झाली. तसंच, वृद्धांपासून ते लहान मुलांनी आपल्या भावनांना वाट करून देत ढसाढसा रडले. प्रशासनाने कोणताही मागचापुढचा विचार न करता गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवला. या सर्व प्रकरणावर शिवसेनेचं (Shivsena Mouthpiece) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial)पुणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे. पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात आहे. गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवणं हा संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे. हेही वाचा-  Pune Ambil Odha : आमच्या घरच्यांना मारलं, आम्ही कुठं जायचं? चिमुरडा ढसाढसा रडला काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या