JOIN US
मराठी बातम्या / पुणे / तरुणीला एकटे पाहून घरात शिरले दोघे अन् हातपाय बांधून तरुणीवर केला बलात्कार

तरुणीला एकटे पाहून घरात शिरले दोघे अन् हातपाय बांधून तरुणीवर केला बलात्कार

महिलांवर होणारे अत्याचार सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरात तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायचंद शिंदे, प्रतिनिधी जुन्नर, 3 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) आळेफाटा (Aalephata) परिसरात धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोन जणांनी घरात शिरून 20 वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. आरोपींनी घरात घुसून मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक (2 accused arrested by Police) केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अशोक हरिभाऊ बनोटे, संदीप भिवसेन सूर्यवंशी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात पीडित मुलगी घरी एकटीच होती. तिच संधी साधून आरोपींनी घरात प्रवेश केला. घरात घुसून अशोक हरिभाऊ बनोटे आणि त्याचा एक अनोळखी साथीदार याने पीडितेला मारहाण करून कापडाने तिचे हातपाय, तोंड बांधून दोन्ही नराधमांनी आळीपाळीनं या मुलीवर बलात्कार केला. LPG Gas Cylinder चा काळाबाजार करणारी टोळी गजाआड, अशी होते तुमच्या सिलेंडरमधून गॅस चोरी, पाहा VIDEO पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये आळेफाटा पोलिसांनी गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. आईच्या फिर्यादीवरून आरोपीच्या वर्णनाप्रमाणे फरार आरोपी यांचा तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून पुणे ग्रामीणचे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अशोक हरिभाऊ बनोटे संदीप भिवसेन सूर्यवंशी या दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने तात्काळ अटक केली. दोन्ही नराधमांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या