JOIN US
मराठी बातम्या / पुणे / डेंग्यूमुळे पिंपरी- चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचं निधन, परिसरात हळहळ

डेंग्यूमुळे पिंपरी- चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचं निधन, परिसरात हळहळ

Archana Barne Died: पिंपरी- चिंचवड महापालिकेतील (Pimpri Chinchwad Municipal Corporation) भाजप (BJP) च्या विद्यमान नगरसेविका (Corporator)अर्चना तानाजी बारणे यांचं मंगळवारी निधन (Died) झालं आहे. डेंग्यूमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी- चिंचवड, 14 जुलै: पिंपरी- चिंचवड महापालिकेतील (Pimpri Chinchwad Municipal Corporation) भाजप (BJP) च्या विद्यमान नगरसेविका **(Corporator)**अर्चना तानाजी बारणे (Archana Barne) यांचं मंगळवारी निधन (Died) झालं आहे. डेंग्यूमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय. त्यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची (Dengue) लागण झाली होती. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये अर्चना बारणे यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. थेरगावमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेतून अर्चना बारणे या प्रभाग क्रमांक 23, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि ग प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भूषविलं होतं. हेही वाचा-  ‘भारतात लोकांना मास्कशिवाय फिरताना बघायचंय’, कोणी व्यक्त ही इच्छा कायम प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवायच्या. कोरोना संसर्गाच्या काळातही त्यांनी लोकांची मोठी मदत केल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एवढंच नाही तर गेल्याच आठवड्यातच त्यांनी प्रभागात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. अर्चना बारणे यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असं कुटुंब आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या