JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस- वेवर (Mumbai-Pune Express Way) ट्रक आणि कंटेनरचा (truck hit container) भीषण अपघात झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 21 जून: मुंबई पुणे एक्स्प्रेस- वेवर (Mumbai-Pune Express Way) ट्रक आणि कंटेनरचा (truck hit container) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघाताचे फोटो समोर आलेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवर ताजे गावाजवळ पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक भीषण होती की कंटेनर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आडवा झाला.

संबंधित बातम्या

या अपघातामुळे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन बंद ठेवल्यात आल्या होत्या. जवळपास दोन तास अपघातग्रस्त वाहन एक्स्प्रेस वेवर पडून होतं. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणेच्या साहाय्यानं अपघातग्रस्त दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्यात. हेही वाचा-  राज्य सरकार 5 वर्ष चालणार?, संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया   मुंबईकडे जाणारी वाहतूक आता सुरु झाली आहे. तसंच अपघातात जखमी असलेल्या ट्रक चालकाला उपचारासाठी सोमटणे येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या