JOIN US
मराठी बातम्या / पुणे / बायकोनं केलेला अपमान जिव्हारी लागला; पुण्यातील तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

बायकोनं केलेला अपमान जिव्हारी लागला; पुण्यातील तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Crime in Pune: पत्नी आणि सासुकडून सातत्यानं होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुण्यातील एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे.

जाहिरात

मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. (File Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 सप्टेंबर: पत्नी आणि सासुकडून सातत्यानं होणाऱ्या त्रासाला कंटाळून (harassment by wife and mother-in-law) पुण्यातील एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. विवाह झाल्यापासून मागील पाच वर्षांपासून पत्नी आणि सासू संबंधित युवकाचा मानसिक त्रास देत होते. बायकोनं आणि सासूने केलेली शिवीगाळ जिव्हारी लागल्यानं तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Young man commits suicide) केली आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि सासूविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. रोहित सुनिल पवार असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. तो पुण्याजवळील लोणी स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. मृत रोहित यांचं नोव्हेंबर 2016 रोजी आरोपी युवतीशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच आरोपी पत्नी आणि सासू रोहितला त्रास देऊ लागल्या होत्या. कुटुंबातून वेगळं राहण्यासाठी आरोपी पत्नी सतत रोहितशी भांडणं करत होती. हेही वाचा- पुण्यात अल्पवयीन मुलीचं धाडस; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर गर्भपातास नकार पत्नी आणि सासू रोहितला नेहमी शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होते. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून 10 ऑगस्ट रोजी रोहितनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. हेही वाचा- लोखंडी स्टॅण्डचे तीन घाव अन् खेळ खल्लास; ‘ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है’ म्हणत.. पण मृत रोहितचे 56 वर्षीय वडील सुनिल रघुनाथ पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बायको आणि सासूविरोधात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी बायको आणि सासूविरोधात कौटुंबीक हिंसाचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या