JOIN US
मराठी बातम्या / पुणे / ganpati visarjan 2021 : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 2 तरुण बुडाले

ganpati visarjan 2021 : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 2 तरुण बुडाले

मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणेश विसर्जन सुरू असताना अचानक दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे.

जाहिरात

मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणेश विसर्जन सुरू असताना अचानक दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 पिंपरी चिंचवड, 19 सप्टेंबर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लाडक्या गणरायाला (ganpati visarjan 2021) निरोप दिला जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (pimpari chinchvad) गणपती विसर्जन दरम्यान इंद्रायणी नदी (Indrayani river) पात्रात दोन मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचं विसर्जन पार पडले आहे. मात्र ठिकठिकाणी गणेश विसर्जन अजूनही सुरूच आहे. पिंपर चिंचवडमध्ये इंद्रायणी नदी पात्रात सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचं विसर्जन केलं जात आहे. ुदत्ता ठोंबरे (वय 20) आणि  प्रज्वल काळे (18) अशी बुडालेल्या तरुणांची नाव आहे.  प्रज्वल काळे हा ठोंबरे यांचा नातेवाईक होता. गणपती निमित्त आला होता.   घटनास्थळी अग्निशमन विभागाने धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे. एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. अमेरिकेत शाळांमधून गायब होतायत वस्तू, TIKTOK VIDEO तून उलगडलं रहस्य तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील शिक्षक हमीद पठाण यांचा 17 वर्षीय मुलगा अरमान पठाण याचा बासलापूर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोहतांना गाळात पाय फसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काका आणि इतर दोन भाऊही गाळात फसले होते. पण, वेळीच गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून  इतरांचे प्राण वाचवले. जळगावात एका गणेश भक्ताचे प्राण वाचले तर, घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळेस फैजपूर हद्दीत तापी नदीवर गेले असता एका भाविकाचा पाय घसरुन पाण्यात पडला असल्याचे लक्षात येताच आपत्ती व्यवस्थापनाच्या सेवकांनी धाव घेत त्या भाविकाचे प्राण वाचविले. शहरातील भुषण प्रभाकर इंगळे (वय 35 रा. गोदावरी कॉलनी)  या रेल्वे कर्मचाऱ्याचे  फैजपूर परिसरात गणरायाचे विसर्जन करत असताना पाय घसरून पाण्यात बुडत असतांना जिल्हा आपत्ती  दलातील सदस्यांनी दुसऱ्या काठावर त्वरीत धाव घेत त्यास  प्रथमोपचार करून त्यास वाचविण्यास  जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्यांना यश मिळाले.  बीड जिल्ह्यात डोल ताशे जप्त बीड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गणपती उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी नऊ दिवस गणपती बाप्पाच्या उत्सवात कोणताही मोठा गाजावाजा गणपती मंडळाने केला नाही. तर आज गणपती विसर्जयादिवशी देखील प्रशासनाने ढोल ताशाला परवानगी दिली नसल्याने, गणपती बाप्पाचं विसर्जन अतिशय साध्या पद्धतीने पार पडलं. दरम्यान काही जणांकडून प्रशासनाचे नियम डावलून ढोल ताशे वाजवण्यात येत होते, मात्र यावेळी पोलिसांनी सूचना केल्यानंतरही पुन्हा ढोलताशे वाजवल्याने, गणपती मंडळाचे ढोल ताशे पोलिसांनी जप्त केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या