JOIN US
मराठी बातम्या / पुणे / शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्नात तुफान गर्दी; 2000 जणांनी एकत्र येत कोरोना नियमांना बसवलं धाब्यावर

शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्नात तुफान गर्दी; 2000 जणांनी एकत्र येत कोरोना नियमांना बसवलं धाब्यावर

शिवसेनेच्या एका नेत्यानं (Shivsena leader) आपल्या मुलाच्या लग्नात जवळपास 2000 लोकांना आमंत्रित करून कोरोना नियमांचा फज्जा उडवला (fuss of corona rules) आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्याप काही शहरात कोरोना विषाणूची स्थिती नियंत्रणात नाहीये. पुण्यातही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात जमावबंदीचा निर्णय लागू केला आहे. असं असतानाही शिवसेनेच्या एका नेत्यानं (Shivsena leader) आपल्या मुलाच्या लग्नात जवळपास 2000 लोकांना आमंत्रित करून कोरोना नियमांचा फज्जा उडवला (fuss of corona rules) आहे. संबंधित लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे (Devram Lande) यांनी आपल्या मुलाचं लग्न शाही थाटात केलं आहे. या लग्नात त्यांनी अनेक आजी-माजी नेत्यांसह सदस्यांना आमंत्रित करत कोरोना नियम पायदळी तुडवले आहे. लांडे यांच्या मुलाच्या लग्नाला जवळपास 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी देवराम लांडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा- ‘विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून…’; मंत्र्याचा VIDEO VIRAL पुण्यातील शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या बारव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात दोन दिवसाचा एक शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा शाही विवाहसोहळा चर्चेत आला आहे. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसोबत आजी-माजी सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. देवराम लांडे यांच्या पुत्राच्या लग्नात कोरोना नियमाचं उल्लंघन झाल्याची फिर्याद पोलीस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- Coronavirus : केंद्राने केरळ आणि महाराष्ट्राला केलं अलर्ट जुन्नर पोलिसांनी बारव येथील महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी आणि देवराम लांडे यांच्यासह अन्य चार नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रकोप सुरू असताना, सरकारमधील नेत्यानं अशाप्रकारचं कृत्य केल्यानं सोशल मीडियात त्यांच्यावर टीका केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या