पुणे, 27 जुलै: आईच्या अंगावर कुत्रा भुंकल्यानं (Dog barked at mother) चार जणांनी पुण्यातील एका तरुणीला बेदम मारहाण (4 Beat a woman) केल्याची घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कोथरूड (Kothrud) पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे. राजाराम मारुती चौधरी, त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा राजाराम चौधरी आणि मंदाकिनी चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं असून सर्वजण कोथरुड परिसरातील म्हातोबानगर परिसरातील रहिवासी आहेत. याप्रकरणी निशा पंडित थरकुडे (वय-40) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. हेही वाचा- मालक आणि मुलाला बसला विजेचा धक्का, पाळीव कुत्र्याने तोंडात तार धरून खेचली पण… नेमकं काय घडलं? फिर्यादी तरुणी आणि आरोपी कुटुंब हे कोथरुड परिसरातील म्हातोबानगर याठिकाणी एकमेकांच्या शेजारी वास्तव्याला आहेत. दरम्यान 30 डिसेंबर 2020 रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास फिर्यादी निशा थरकुडे यांनी एका कुत्र्याला खायला टाकले होते. यावेळी संबंधित कुत्रं बाजूने जाणाऱ्या मालुबाई चौधरी यांच्यावर भुंकले होते. आईच्या अंगावर कुत्रा भुंकल्यानं मुलगा राजाराम चौधरी याला राग अनावर झाला. त्यानं फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करत डाव्या हाताची करंगळी पकडून गंभीर दुखापत केली. हेही वाचा- 2 मुलं गाळात रुतली, वाचवायला वडिलांनी मारली पाण्यात उडी,तिघांचाही मृत्यू याप्रकरणी फिर्यादी निशा थरकुडे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण याची सुरुवातीला फारशी दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या घटनेची चौकशी व्हावी यासाठी फिर्यादी तरुणी निशा यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोथरुड पोलिसांना संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, काल कोथरुड पोलीस ठाण्यात संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरुड पोलीस करत आहेत.