JOIN US
मराठी बातम्या / पुणे / ...म्हणून ग्रामपंचायतीनं गावभर वाटले कंडोम; पुण्यात कोरोनानंतर अन्य एका VIRUS ने वाढवली चिंता

...म्हणून ग्रामपंचायतीनं गावभर वाटले कंडोम; पुण्यात कोरोनानंतर अन्य एका VIRUS ने वाढवली चिंता

Pune Zika Virus Infection: पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जाहिरात

बेलसर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचं वाटप केलं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 ऑगस्ट: कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर (Corona pandemic) महाराष्ट्रात आता झिका विषाणूनंही (zika Virus)धडक मारली आहे. पुणे (Pune) जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर (Belsar) येथे राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बेलासर गावात झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील अनेक आरोग्य टीमनं त्याठिकाणी जाऊन नागरिकांच्या विविध चाचण्या केल्या आहेत. तसेच झिका व्हायरसचा इतरांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचं (निरोध) वाटप करण्यात आलं (Distribution of condoms by Gram Panchayat) आहे. तसेच पुढील किमान चार महिने गावातील महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. पुरुषांच्या विर्यात झिका विषाणू आढळत असल्यानं पुढील 4 महिने लैंगिक संबंध टाळावेत, किंवा सुरक्षित पद्धतीनं शरीरसंबंध ठेवावेत, असंही वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे राज्याची स्थिती बिकट झाली असताना, झिका विषाणूनं आणखी चिंता वाढवली आहे. बेलासर गावात तर सर्वत्र भीतीच वातावरण पसरलं आहे. हेही वाचा- घोड्यांच्या अँटीबॉडीजपासून कोल्हापुरात Corona औषध, 90 तासांत बरा होणार रुग्ण झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसरमध्ये सापडला होता. यानंतर बेलसर गावाची देशभर चर्चा झाली होती. बेलसरमधील 55 वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य प्रशासनाकडून बेलसर गावात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून बेलसर गावात पुढचे तीन महिने कुठलीही महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचं  वाटप केलं आहे. हेही वाचा- Unlock सुरू झालंय; पण सावधान! या शहरात 5 दिवसांत 242 मुलांना कोरोना एडिस एजिप्त डासापासून झिका विषाणूची लागण होते. झिका विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना आहे. झिका विषाणूमुळे गरोदर महिलांच्या पोटातील बाळावर अत्यंत वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. बाळाच्या मेंदूची वाढ खुंटू शकते. तसचे अकाली प्रसूती होण्याचा धोकाही अधिक असतो. झिका विषाणू पुरुषांच्या विर्यात तब्बल चार महिने जिवंत राहू शकतो. त्यामुळे गावातील महिलांनी पुढील किमान तीन महिने गर्भधारणा टाळली पाहिजे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतीनं गावात विविध ठिकाणी फलक लावून गावात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या