JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कोरोना नियमांची ऐशीतैशी; गुंडाच्या अंत्ययात्रेत 150 बाईकची रॅली; VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग

पुण्यात कोरोना नियमांची ऐशीतैशी; गुंडाच्या अंत्ययात्रेत 150 बाईकची रॅली; VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अंत्ययात्रेसाठी अवघ्या 20-25 जणांनाच मुभा आहे, असे असताना खून झालेल्या एका सराईत गुन्हेगाराची शनिवारी दुपारी धनकवडी ते कात्रज स्मशानभूमी दरम्यान अंत्ययात्रा निघाली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 16 मे : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या अंत्ययात्रेसाठी अवघ्या 20-25 जणांनाच मुभा आहे, असे असताना खून झालेल्या एका सराईत गुन्हेगाराची शनिवारी दुपारी धनकवडी ते कात्रज स्मशानभूमी दरम्यान अंत्ययात्रा निघाली. हे प्रकरण तेवढ्यावरच थांबले नाही, तर पोलिसांच्या नाकावर टिच्चून अंत्ययात्रेत 100 ते 150 दुचाकींची रॅलीही निघाली. शेवटी सहकारनगर पोलिसांनी 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके यांच्यासह त्यांच्या साथीदारांच्याविरूद्ध कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

हे ही वाचा- VIDEO: कुत्र्याला लाथ मारण्याचा नादात सुटला रिक्षावरील ताबा, तोंडावर आपटला चालक या प्रकारानंतर नियम तोडणाऱ्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करून अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढणाऱ्याची धरपकड सुरू आहे. पुणे पोलिसांच्या 15 पथकांकडून आरोपी तसेच वाहने ताब्यात घेण्यात येत आहे. या प्रकरणात सहकारनगर पोलिस ठाण्यात 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. दरम्यान या घटनेनंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या