पिंपरी- चिंचवड, 01 जुलै: उद्योगपती युवक काँग्रेसचा **(Youth Congress General Secretary)**सरचिटणीस गणेश गायकवाड (Ganesh Gaikwad) विरोधात पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. गणेश गायकवाड विरोधात 8 दिवसांपूर्वीच जमीन हडपल्या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढंच काय तर पुण्यातल्या हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये युवक काँग्रेसच्या सरचिटणीसविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद देखील आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते गणेश गायकवाड यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या महिन्यात 25 जून रोजी गणेश गायकवाड यांच्या विरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पिंपळे निलख येथील जमीन मालक अजिंक्य काळभोर यांची जमीन बळकावणं, त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणे अशा स्वरूपाचा गुन्हा गणेश नानासाहेब गायकवाड, त्याचे वडील नानासाहेब शंकर गायकवाड, गणेश साठे आणि त्याच्या दोन-तीन इतर साथीदारा विरोधात दाखल करण्यात आला. हेही वाचा- पडळकरांच्या गाडीवर दगडफेक प्रकरण चिघळणार; कार्यकर्ते आक्रमक, Live Video वरील प्रकरणीआधी हिंजवडी पोलीस स्टेशन मध्येही गणेश गायकवाड विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. बांधकाम व्यावसायिक विजय वसंत कुलकर्णी यांच्या ट्रीनीटी रिऍलिटी फर्मची 60 गुंठे जागेत बेकायदेशीर रित्या पत्र्याचे आणि तारेचे कुंपण करून जागा बळकावल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.