JOIN US
मराठी बातम्या / पुणे / वंशाच्या दिव्यासाठी महिलेला नग्न करून अंगारा फासला, पुण्यातील संतापजनक घटना

वंशाच्या दिव्यासाठी महिलेला नग्न करून अंगारा फासला, पुण्यातील संतापजनक घटना

या दोघांना वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा, असा आग्रह होता. त्यामुळे पीडित महिलेचा ते वारंवार अत्याचार करत होते.

जाहिरात

File Photo

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी, 29 ऑगस्ट : वंशाला दिवा हवा म्हणून गर्भातच अर्भकाचा गळा आवळण्याचा सैतानी कृत्य काही महाभाग करत असतात, किंवा नवजात स्त्री अर्भकाला इतरत्र फेकून देतात, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटना वारंवार घडतच आहे. त्यातच मुलगा (son) व्हावा म्हणून एका पतीने त्याच्या पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा फासून तिचा छळ केल्याची अत्यंत धक्कादायक घटना  पिंपरी -चिंचवड (pimpari chinchvad) शहरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील म्हाळुंगे परिसरात ही घटना समोर आली आहे. ऋषिकेश सुदाम बोत्रे असं या नराधम पतीचे नाव आहे. त्याने आणि त्याच्या आईने हे कृत्य केलंय. बँकेनं 35 लाखांचं कर्ज नाकारलं, निराश झालेल्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल! या दोघांना वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा, असा आग्रह होता. त्यामुळे पीडित महिलेचा ते वारंवार अत्याचार करत होते. हे दोघे एका भोंदूबाबाकडे गेले. तिथून त्यांनी  अंगारा आणि हळद- कुंकू आणलं. त्यानंतर त्याने सांगितल्या प्रमाणे पीडित महिलेच्या संपूर्ण नग्न शरीरावर लावले. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे पीडित महिला पार हादरून गेली. पुण्यात स्कॉलर मुलांचा ओढा सायन्सऐवजी चक्क आर्ट्सकडे; वाचा यामागचं कारण अखेर या कृत्यामुळे हादरून गेलेल्या महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्यासोबत घडलेली आपबिती पोलिसांना सांगितली. त्यानंतर अघोरी कृत्य करण्यात आल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी पती ऋषिकेश सुदाम बोत्रे , सासू आणि भोंदू बाबा विरोधात चाकण पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केले. या प्रकरणात आरोपी फरार असून चाकण पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. जादूटोणा-करणी सारख्या अघोरी प्रथांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायदा पारित केला आहे. तरी देखिल शहरी आणि ग्रामीण भागात जादूटोणा आणि करणी करण्यासारखे अघोरी प्रकार घडत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या