JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पत्नीच्या निधनानंतर दु:खानं आतून पोखरलं; पुण्यात पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:ला संपवलं

पत्नीच्या निधनानंतर दु:खानं आतून पोखरलं; पुण्यात पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:ला संपवलं

Suicide in Pune: पुण्यातील मोटार परिवहन विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector of Police suicide) पदावर कार्यरत असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे.

जाहिरात

राजेश महाजन असं आत्महत्या करणाऱ्या 50 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 31 ऑगस्ट: पुण्यातील (Pune) मोटार परिवहन विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector of Police suicide) पदावर कार्यरत असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. त्यांनी गळफास घेत आत्महत्या (Police Officer Suicide) केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. संबंधित घटना सोमवारी दुपारी पुण्यातील हडपसर येथील हरपळे वस्तीत घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. राजेश महाजन असं आत्महत्या करणाऱ्या 50 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. मृत महाजन हे मोटार परिवहन विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय लष्करातही काम केलं आहे. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी लष्करी सेवेतून निवृत्ती स्विकारत पोलीस सेवेत आले होते. मागील काही वर्षांपासून ते पुणे पोलीस दलातच कार्यरत होते. सर्व काही सुरळीत सुरू होतं. हेही वाचा- अश्लील कमेंटबाबत जाब विचारल्यानं महिला पोलिसावर हल्ला; रॉडनं वार करत फोडलं डोकं पण गेल्या महिन्यात महाजन यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. पत्नीचं निधन झाल्यानंतर ते पूर्णपणे खचून गेले होते. ते मोटार परिवहन विभागात असतानाही कोणाशी फारसं बोलत नव्हते. पत्नीच्या निधनाच्या दु:खानं त्यांना आतून पोखरलं होतं. त्यामुळे त्यांना नैराश्य आलं होतं. यातूनच त्यांनी सोमवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. हेही वाचा- पतीच्या भयंकर कृत्यानं औरंगाबाद हादरलं; पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, कारण समोर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महाजन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट करेल असा कोणताही पुरावा अद्याप पोलिसांना मिळाला नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या