JOIN US
मराठी बातम्या / पुणे / चिंचवडमध्येही मनसेचा भाजपला पाठिंबा पण...; घातली 'ही' अट

चिंचवडमध्येही मनसेचा भाजपला पाठिंबा पण...; घातली 'ही' अट

कसब्यामध्ये मनसेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर चिंचवडमध्ये मनसे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर मनसेनं आपली भूमिका जाहीर केली आहे.

जाहिरात

राज ठाकरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 फेब्रुवारी :  भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अश्वीनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी असा भाजपचा प्रयत्न होता. मात्र महाविकास आघाडीने दोन्हीकडे देखील आपला उमेदवार दिला आहे. मनसेने कसब्यात भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर चिंचवडमध्ये काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष होतं. अखेर मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे. चिंचवडमध्ये मनसेनं भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना पाठिंबा दिला आहे. मात्र पाठिंबा देताना मनसेने काही अटी देखील घातल्या आहेत. मनसेने जरी अश्विनी जगताप यांना पाठिंबा दिला असला तरी मनसेचे कार्यकर्ते अश्विनी जगताप यांचा सध्या प्रचार करणार नाहीत, या शर्तीवर मनसेने अश्विनी जगताप यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी माहिती दिली आहे. आज मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष सचिन चिखले ,  भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि इतर पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत   चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये ही लढत असणार आहे. या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या