JOIN US
मराठी बातम्या / पुणे / गणपतीपुळ्याला जात असताना घडली एक चूक, पुण्याच्या बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू

गणपतीपुळ्याला जात असताना घडली एक चूक, पुण्याच्या बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू

नाताळ आणि ख्रिसमसच्या सुट्टीमुळे गणपतीपुळ्याला देवदर्शनासाठी चाललेल्या बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदापूर, 25 डिसेंबर : ख्रिसमस आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे सुट्टीवर तसंच देवदर्शनाला राज्यातले नागरिक मोठ्याप्रमाणावर जात आहेत. इंदापूरचे महेंद्र घोगरे हेदेखील त्यांच्या 4 वर्षांच्या मुलासोबत गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जात होते, पण एका चुकीमुळे या बाप-लेकांना जीव गमवावा लागला आहे. इंदापूर तालुक्यातील भाविक सुट्टीमुळे गणपतीपुळ्याला देवदर्शनासाठी निघाले होते, पण त्यांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे अपघात झाला आहे. हा अपघात कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरूड येथे झाला आहे. या अपघातात इंदापूर तालुक्यातील बावडा गावातील बाप-लेकांना जीव गमवावा लागला आहे.

वारणा नदीवर असलेल्या कोकरूड-नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात महेंद्र अशोक घोगरे या 35 वर्षीय व्यक्तीचा आणि त्यांचा मुलगा महेंद्र घोगरे या 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हे दोघंही पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा-वकिलवस्तीचे रहिवासी आहेत. या अपघातामध्ये आणखी तिघेजण जखमी झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या