JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मित्रानं आखला प्लॅन अन् पुण्यात घडला 'स्पेशल 26' थरार; सराफाला 30 तोळे सोन्यासह 20 लाखांना लुटलं

मित्रानं आखला प्लॅन अन् पुण्यात घडला 'स्पेशल 26' थरार; सराफाला 30 तोळे सोन्यासह 20 लाखांना लुटलं

Crime in Pune: आयकर विभागाचे अधिकारी (Income Tax Department Officer) असल्याचं सांगत पुण्यातील एका सराफाला 30 तोळे सोन्यासह 20 लाखांना गंडा (Robbery) घातल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

अवघ्या काही तासांतच पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (फोटो-सकाळ)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 ऑगस्ट: आयकर विभागाचे अधिकारी (Income Tax Department Officer) असल्याचं सांगत पुण्यातील एका सराफाला 30 तोळे सोन्यासह 20 लाखांना गंडा (Robbery) घातल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत पुण्यातील एका सराफा व्यावसायिकाचं अपहरण (Gold Businessman Kidnapping) केलं होतं. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील 30 तोळे सोने आणि 20 लाख रुपये घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांतच पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. सकाळ नं दिलेल्या वृत्तानुसार, नंदकिशोर कांतिलाल वर्मा (वय 41) असं फिर्यादी सराफा व्यावसायिकाचं नाव असून ते दत्तनगर परिसरातील रहिवासी आहेत. याप्रकरणी त्यांनी शनिवारी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शनिवारी रात्री उशीरा पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडील 20 लाख रुपये आणि  20 तोळे सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. हेही वाचा- ‘हॅलो, ED ऑफिसमधून बोलतोय’, करोडो रुपये उकळणाऱ्या ‘गोडसे’ फिल्मच्या नायकाला अटक अटक केलेल्या आरोपींमधील एकजण हा फिर्यादी सराफा व्यावसायिकाचा मित्र असल्याची माहिती उघड झाली आहे. फिर्यादीकडे एवढा जास्त पैसा असल्याची माहिती याच आरोपीला माहीत, त्यानुसार आरोपीनं प्लॅन आखून व्यावसायिकाच्या लाखों रुपयांवर डल्ला मारला आहे. फिर्यादी नंदकिशोर वर्मा यांचा नथ बनवण्याचा व्यवसाय आहे. ते घरात बसूनच नथ बनवतात आणि अन्य सराफांना याचा पुरवठा करतात. दरम्यान व्यवसाय वाढल्यानं त्यांनी परिसरात एक दुकानं विकत घेण्याचा विचार सुरू केला. हेही वाचा- पतीनं खात्यात जमा केले 39 लाख रुपये; पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी त्यामुळे वर्मा यांच्या बक्कळ पैसा असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार आरोपी फिर्यादी वर्मावर पाळत ठेवून होते. संधी मिळताच आरोपींनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत वर्मा याचं अपहरण केलं. यानंतर त्यांना जांभुळवाडी रस्त्यावरील स्वामी नारायण मंदिरापाशी नेऊन त्यांच्याजवळील सर्व मुद्देमाल हिसकावण्यात आला. आणि त्यांना तिथेच सोडून आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या