पुणे, 02 जुलै: 5 मित्रांकडून एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape on minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी मागील दोन वर्षांपासून फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral photos) देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. आरोपींनी कधी अलिशान वाहनात तर कधी लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडितेनं गुरुवारी रात्री उशीरा आळेफाटा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह (POCSO) अन्य कलमांतर्गत चार आरोपींना अटक (4 arrest) केली असून एका आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील कारवाई केली जात आहे. निखिल पोटे, दया टेमगिरे, विकी पोटे, बंटी तितर, यश गाडेकर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून सर्व आरोपी 28 वर्षांवरील आहे. संबंधित आरोपींनी काही दिवसांपूर्वी पीडित मुलीशी ओळख करून तिचे काही फोटो काढले होते. यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच मित्रांनी दोन वर्ष सामूहिक बलात्कार केला आहे. त्याचबरोबर आरोपींनी पीडितेच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हेही वाचा- Aurangabad: 2 लग्नं झालेल्या कराटे शिक्षकानं अल्पवयीन मुलीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; 18 वर्षांची होताचं नेलं पळवून त्यामुळे पीडित मुलगी मागील दोन वर्षांपासून आरोपींचा त्रास सहन करत होती. संबंधित पाच आरोपी मित्रांनी नगर रोडवरील एक लॉजवर 15 जून 2019 ते 15 जून 2021 च्या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे सर्व आरोपी 28 वर्षांपेक्षा पुढील वयाचे आहेत. त्यांनी मागील दोन वर्षांपासून आपल्या वयापेक्षा आर्ध्या वयाच्या मुलीला नरक यातना दिल्या आहेत. हेही वाचा- अल्पवयीन मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, पाहुणे आणि शेजाऱ्यांशी लैंगिक संबंधांची सक्ती, गर्भवती झाल्यामुळे प्रकरणाला वाचा पोलिसांनी पाचही आरोपी मित्रांविरुद्ध बाललैंगिक अत्याचारासह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपींकडून एक आलिशान चारचाकीही ताब्यात घेतली आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार या घटनेचा पुढील तपास करत आहे.