अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे साडीत त्यांना आरामदायक वाटत नाही किंवा काम करताना चालताना समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण असं असलं तरी देखील अनेकांना हे माहित नाही की साडी नेसण्याचे वैज्ञानिक कारणं देखील आहेत. जे महिलांसाठी फायद्याचे आहेत.
तुम्हाला साडी नेसण्याचे वैज्ञानिक कारण आहे हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल, तसेच याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली असेल तर चला मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
साडी नेसण्याने थर्मॉस फ्लास्कप्रमाणे, शरीराचे तापमान आजूबाजूच्या हवामानानुसार नियंत्रित राहाते. जसे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणं आणि हिवळ्यात शरीराला गरम ठेवणे.
साडी आपल्या सर्व इंद्रियांना निरोगी ठेवते: असे मानले जाते की ज्या पद्धतीने साडी नेसली जाते, त्यामुळे शरीरातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि व्यक्तीचे मन, आत्मा आणि शरीर निरोगी आणि आनंदी होते.
साडी नेसल्याने तुम्ही त्याचा पदर ज्या शैलीत बांधता त्यानुसार तुमच्या शरीराचे तापमान वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रित करता येते. उदाहरणार्थ, माधवी इंद्रगंटी यांच्या अभ्यासात असे आढळून आले की, जर तुम्ही तुमचे हात पूर्णपणे पदराने झाकले तर तुम्हाला शरीराच्या इन्सुलेशनमध्ये 47% वाढ होईल! तर, जर एखाद्या व्यक्तीने आपला पदरआपल्या खांद्यावर ठेवला तर शरीराचे इन्सुलेशन कमी होते.
- कोणीही परिधान करू शकते: साडी इतकी अष्टपैलू आहे की ती नेसणाऱ्या कोणालाही ती शोभते. तुमच्या शरीराचा प्रकार, त्वचेचा रंग किंवा शरीराचा पोत कसा ही असोत तुम्हाला ती सुट होते.
सर्व ऋतूंना साजेसे: हिवाळा असो वा उन्हाळा किंवा पाऊस साडी असते. वेगवेगळ्या कपड्यांपासून बनवलेले, अनोखे लुक देणारी साडी तुम्ही वेगवेगळ्या ऋतूंप्रमाणे नेसू शकता.