NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / निर्मला सीतारमण बजेट 2023 ला कोणती साडी नेसणार? नेटकऱ्यांना पडलाय भलताच प्रश्न

निर्मला सीतारमण बजेट 2023 ला कोणती साडी नेसणार? नेटकऱ्यांना पडलाय भलताच प्रश्न

2019 ते 2022 निर्मला सीतारमण यांच्या साड्या नेहमीच राहिल्या चर्चेत, यावर्षी कोणती साडी? नेटकऱ्यांचं लक्ष #Budget2023 कडे

18

पुढील काही तासात 2023-24 च्या अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण दरवर्षी प्रमाणे बजेट सादर करणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे . पण यासोबतच निर्मला सीतारमण यांच्या साडीवर देखील लोकांचं लक्ष असणार आहे.

28

दरवर्षी बजेट सादर करताना निर्मला सीतारमण जी साडी नेसतात. ती साडी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे या वर्षी त्या कोणती साडी घालणार हा प्रश्न सोशल मीडियावर जोर धरत आहे.

38

त्या अर्थसंकल्पाला कोणती साडी नेसतील हे तर त्या दिवशी कळेलच. पण त्यांनी यापूर्वी सादर केलेल्या बजेटमध्ये कोणत्या साड्या नेसल्या होत्या, ज्या नेहमीच चर्चेत राहिल्या, चला एक नजर टाकू.

48

नीर्मला सीतारमण यांनी फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर 2019 साली पहिल्याच बजेटला गुलाबी रंगाची आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली होती. या साडीला (Mangalgiri saree) मंगलागिरी साडी असं म्हणतात.

58

2020 च्या बजेटला निर्मला सीतारमण यांनी नेसलेली पिवळ्या-सोनेरी रंगाची सिल्क साडी देखील खूपच चर्चेत होती. या साडीला आकाशी रंगाची हलकी बॉर्डर आहे.

68

2021 च्या बजेटला निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडीने देखील लोकांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आहे. त्यांनी २०२१ च्या बजेटला लाल रंगाची pochampalli साडी नेसली होती.

78

2022 मध्ये निर्मला सीतारमण यांनी मरुन रंगाची हॅन्डलूम साडी नेसली होती. या साडीला चंदेरी रंगाची बॉर्डर होती. ही साडी ओडीसाची असल्याचं सांगितलं जातं. या साडीला Bomkai किंव Sonepuri साडी असं देखील म्हणतात.

88

असं म्हणतात की त्यांच्या साडीचा नेहमीच बजेटशी काहीतरी संबंध नक्कीच असतो. सोशल मीडियावर असा प्रश्नच उपस्थीत केला जातो पण यापैकी काय खरं आणि काय खोटं हे तर त्यांनाच ठावूक.

  • FIRST PUBLISHED :