आजकाल बरेच लोक परदेशी ब्रँडऐवजी आपल्या देशातील ब्रँडचे स्मार्टफोन घेण्यास पसंती देतात. पण अनेकदा इथे उपलब्ध डिव्हाइस त्यांच्या गरजेनुसार नसतात. ही पोकळी भरून काढण्यासाठी लावाने Blaze 5G स्मार्टफोन लॉन्च केलाय.
Lava Blaze 5G स्मार्टफोन 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच HD+ डिस्प्लेसह येतो. हे ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 SoC चिपसेटसह सुसज्ज आहे, जो 4GB आणि 6GB RAM ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देखील मिळतो. या डिव्हाइसमध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, एक डेप्थ कॅमेरा आणि LED फ्लॅशसह मॅक्रो लेन्स आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. या हँडसेटमध्ये तुम्हाला 5,000mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळते.
Lava च्या या डिव्हाइसची किंमत आतापर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व 5G स्मार्टफोनच्या तुलनेत सर्वात कमी आहे. 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 16,345 रुपये आहे, परंतु तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वरून 27% डिस्काउंटसह फक्त 11999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
बँक ऑफर्सच्या मदतीने तुम्ही या स्मार्टफोनवर एक्स्ट्रा बचत देखील करू शकता. बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डने पैसे भरून तुम्ही Amazon वर या फोनसाठी 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकता. याशिवाय या डिव्हाइसवर एक्सचेंज ऑफर आणि EMI देखील उपलब्ध आहे.