ऋतुराज गायकवाड :- रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणारा ऋतुराज गायकवाड हा आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे. ऋतुराज पहिल्या सामन्यापासूनच मैदानात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत आहे. त्याने आतापर्यंत चेन्नईकडून खेळताना 3 सामन्यात 189 धावा केल्या आहेत. यासह त्याने पहिल्या दहा दिवसात ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान देखील मिळवला आहे.
तुषार देशपांडे :- मुंबईच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा तुषार देशपांडे हा आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे. आयपीएल 2023 मधील पहिला इम्पॅक्ट प्लेअर ठरलेल्या तुषार देशपांडेने चेन्नईच्या तीन सामन्यात इम्पॅक्ट दाखवला आहे. तुषारने आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने पहिल्या दहा दिवसात पर्पल कॅप पटकावण्याचा मान देखील मिळवला आहे.
अजिंक्य रहाणे :- भारताचा स्टार फलंदाज आणि मुंबईच्या क्रिकेट संघाकडून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा खेळणारा अजिंक्य रहाणे याने चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला. आयपीएल 2023 मध्ये धोनीने त्याला मुंबई विरुद्ध खेळण्याची संधी दिली. या संधीच सोन करून अजिंक्यने 61 धावा केल्या. हे करताना त्याने केवळ 19 बॉलमध्ये अर्धशतक केले, अजिंक्यच्या बॅटमधून निघालेले हे अर्धशतक आयपीएल 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतकं ठरले.
शार्दूल ठाकूर :- भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेला शार्दूल ठाकूर हा आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून चांगली कामगिरी करीत आहे. ऑल राउंडर खेळाडू असलेला शार्दूल ठाकूरने आयपीएल 2023 मध्ये 76 धावा केल्या आहेत. तसेच त्याने संघासाठी 1 विकेट घेतली आहे.
राहुल त्रिपाठी : महाराष्ट्राचा धाकडं फलंदाज राहुल त्रिपाठी हा आयपीएल २०२३ मध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून खेळत आहे. राहुल त्रिपाठीने आयपीएलच्या नव्या सिजनला सुरुवात होताच आपल्या खेळीने संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. राहुल त्रिपाठीने 3 सामन्यात 108 धावा केल्या आहेत.