जर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवायची असेल, तर तुम्ही PPF, NPS, ELSS, कर बचत FD इत्यादी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. याद्वारे तुम्हाला एकूण 1.5 लाख रुपयांची सूट मिळू शकते. जर तुमची ही लिमिट संपली असेल तर तुम्ही इतर पर्यायांद्वारे कर सूट मिळवू शकता. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. इमरजन्सीमध्ये PPF मधून पैसे कसे काढायचे? काय आहेत नियम? घ्या जाणून
तुम्ही तुमच्या मुलांची ट्यूशन फीस देत असाल तर तुम्ही टॅक्स सेविंगसाठी क्लेम करू शकता. तुम्ही फक्त दोन मुलांची ट्यूशन फीस क्लेम करू शकता. नवं घर घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या कुठे मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan
जर तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली असेल, तर तुम्ही आयकर कलम 10(16) अंतर्गत स्कॉलरशिपमध्ये मिळालेल्या रकमेवर कर सूट मागू शकता. बचतीसाठी पोस्ट ऑफिसची ही स्किम आहे बेस्ट, 95 रुपयांच्या बचतीने मिळतील 14 लाख!
तुम्ही रेंटच्या घरात राहत असल्यास, तुम्ही आयकर कलम 80GC अंतर्गत रेंटच्या रकमेवर टॅक्स सूटचा दावा करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 10BA फॉर्म भरावा लागेल.
याशिवाय तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी दिल्यास, तुम्ही त्यावर आयकर कलम 80GGC अंतर्गत क्लेम करू शकता.
याशिवाय, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतले असेल, तर तुम्ही कर्जाच्या व्याजावर कर सूट मिळवू शकता.