आयपीएल सुरु झाली आहे. अशा वेळी ड्रिम 11 सारखे गेम्स लोक मोठ्या प्रमाणात खेळतात. यासोबतच तुम्ही रमी सर्कल किंवा Mycircle11 सारख्या इतर गेमिंग वेबसाइटच्या माध्यमातून पैसे कमावत असाल तर आजपासून तुमच्या प्रॉफीटवर तुम्हाला पैसे भरावे लागतील.
सरकारने या अर्थसंकल्पात तरतूद केली होती की 1 एप्रिलपासून ऑनलाइन गेमिंगच्या प्रत्येक कमाईवर 30 टक्के TDS कापला जाईल.
यापूर्वी, हाच टीडीएस फक्त 10,000 रुपयांपेक्षा जास्त जिंकलेल्या रकमेवर लागू होता.
मात्र यापुढे गेममधून जिंकलेल्या प्रत्येक रकमेवर TDS कापला जाईल.
करचोरी रोखण्याचा यामागे सरकारचा हेतू आहे. मात्र, ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्यांच्या खिशाला यामुळे कात्री लागणार आहे.