NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Union Budget 2023: बजेटच्या भाषणातील शब्दांचे अर्थ कळत नाहीत? एका क्लिकवर घ्या जाणून

Union Budget 2023: बजेटच्या भाषणातील शब्दांचे अर्थ कळत नाहीत? एका क्लिकवर घ्या जाणून

Union Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांविषयी आपण जाणून घेऊया.

110

सरकार दरवर्षी 1 फेब्रुवारीला सादर करत असलेला अर्थसंकल्प हाच देशाचा लेखाजोखा असतो. सरकारला वर्षभरात कुठून कमाई होईल आणि कुठे आणि किती खर्च होईल ही सर्व माहिती यामध्ये दिलेली असते. मात्र अनेकांना बजेटचे भाषण हे कंटाळवाणे वाटते. कारण त्यांना यामधील शब्दांचे अर्थ कळत नाही. आज आपण बजेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ जाणून घेणार आहोत.

210

Financial Year : 1 जानेवारीपासून आपल्यासाठी नवीन वर्ष सुरू होते आणि 31 डिसेंबरला वर्ष संपते. तर सरकार आपले काम आर्थिक वर्षाच्या आधारे करते. आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते आणि ते पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत चालते.

310

Fiscal-Revenue Deficit : ज्यावेळी सरकारची कमाई खर्चापेक्षा कमी असते तेव्हा वित्तीय तूट (Fiscal Deficit)हा शब्द भाषणात वापरला जातो. दुसरीकडे, महसुली तूट (Revenue Deficit) म्हणजे सरकारचे उत्पन्न निश्चित लक्ष्यानुसार नसते.

410

Trade Deficit : या शब्दाचा अर्थ म्हणजे व्यापारात घाटा असणे.

510

Direct-Indirect Tax : सामान्य माणसाकडून थेट घेतलेल्या कराला Direct Tax म्हणतात. उत्पादन शुल्क किंवा कस्टम ड्युटीद्वारे जनतेकडून जो कर वसूल केला जातो त्याला Indirect Tax म्हणतात.

610

Disinvestment : निर्गुंतवणुकीचा (Disinvestment)उल्लेख तुम्ही अनेकदा ऐकला असेल. ज्यावेळी सरकार सरकारी कंपन्यांचे भागभांडवल विकते तेव्हा त्यासाठी हा शब्दप्रयोग केला जातो.

710

Budget Estimates : सरकारने आर्थिक वर्षात जे कमावले आणि खर्च केले त्याला अर्थसंकल्पीय अंदाज म्हणतात.

810

Blue Sheet : बजेटशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि त्यासंबंधित आकड्यांच्या निळ्या रंगाच्या सीक्रेट शीटला ब्लू शीट म्हणतात.

910

Exomption : देशातील करदात्यांच्या उत्पन्नाला, ज्यावर कोणताही कर आकारला जात नाही, त्याला सूट (Exomption) म्हणतात.

1010

Consolidated Fund : सरकार उधारी किंवा सरकारी कर्जावर मिळालेल्या व्याजातून जे काही कमावते, त्याला एकत्रित निधी (Consolidated Fund) म्हणतात आणि देशात सरकारकडून केला जाणार खर्च या निधीतून केला जातो. Contingency Fund याला आकस्मिक निधी असे म्हणतात. आपत्कालीन परिस्थितीत सरकार ज्या निधीतून पैसे काढून खर्च करते त्याला Contingency Fund म्हणतात.

  • FIRST PUBLISHED :