भारतीय पोस्ट ऑफिस बचतीसाठी ग्राहकांना अनेक योजना ऑफर करतो. यामध्ये मंथली ते एकरकमी जमा केले जाऊ शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बचत केलेल्या रकमेवर हमी आणि सुरक्षित परतावा मिळतो. किसान विकास पत्र ही अशीच एक योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूकीची रक्कम निश्चित कालावधीत दुप्पट होते. सरकारने वर्षाच्या सुरुवातीला या योजनेवरील मिळणाऱ्या व्याजदरातही वाढ केली आहे.
पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना : किसान विकास पत्र योजनेत, गुंतवणुकीची रक्कम केवळ 120 महिन्यांत म्हणजे 10 वर्षांत दुप्पट होते. 1 जानेवारी 2023 पासून, योजनेत दरवर्षी मिळणारा व्याजदर 7.2% पर्यंत वाढवण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे या योजनेत गुंतवणूकदार दर महिन्याला 1000 रुपयांच्या गुंतवणुकीसह बचत सुरू करू शकतो. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, परंतु किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. Post Office सेविंग्स अकाउंट्मध्ये असे चेक करा बॅलेन्स, 7 सोप्या पद्धती
योजनेतील पैसे होतात डबल : तुम्ही किसान विकास पत्र मध्ये एकरकमी 10 लाख रुपये गुंतवले आहेत. तर गुंतवणुकीची रक्कम 120 महिन्यांत 7.2% वार्षिक व्याजदराने 20 लाख रुपये होईल. यामध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक रक्कम आणि त्यावर मिळालेल्या व्याजाची 10 लाख असे 20 लाख तुम्हाला मिळतील. Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा 'हे' काम
योजनेचे विशेष वैशिष्ट्य : किसान विकास पत्र योजना 1988 मध्ये सुरू झाली. यामध्ये गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स डिडक्शन मिळते. 2014 मध्ये, सरकारने मनी लाँडरिंगचा धोका टाळण्यासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीसाठी पॅन कार्ड अनिवार्य केले होते.
10 लाख किंवा त्याहून अधिक गुंतवणूक केल्यास आयटीआर, सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट यांसारखे उत्पन्नाचा पुरावाही सादर करावा लागेल. याशिवाय ओळखपत्र म्हणून आधार द्यावा लागतो.