NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / देशात पहिल्यांदाच समुद्रात असणार स्टेशन! समोर आले 4 स्टेशनचे डिझाइन

देशात पहिल्यांदाच समुद्रात असणार स्टेशन! समोर आले 4 स्टेशनचे डिझाइन

देशातील मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (MAHSR) कॉरिडॉर उर्फ ​​मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पूर्ण होण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतेय. कारण ही देशातील पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या भागात, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरवरील ठाणे, विरार, बोईसर आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या चार बुलेट ट्रेन स्टेशनच्या प्लानिंगचे फोटोज जारी करण्यात आले आहे.

16

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर अंतर्गत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार आणि बोईसर स्टेशनचे डिझाइन मुंबईत एका कार्यक्रमात सार्वजनिक करण्यात आली.

26

याआधी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकाच्या डिझाईनच्या काही स्लाईड्स याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु चित्रांचा संपूर्ण सेट समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्टेशनची रचना ढग आणि अरबी समुद्राच्या वाढत्या लाटांपासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.

36

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हे भारतातील पहिले अंडरसी स्टेशन असेल. HSR स्टेशन हे एकमेव भूमिगत स्टेशन असेल ज्यावर गुरुवारी काम सुरू झाले.

46

हे स्थानक जमिनीपासून सुमारे 24 मीटर खोलीवर बांधण्याची योजना आहे. यात तीन स्तर असतील - एक प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर, विक्रोळी येथे बांधकाम सुरू आहे. IRCTC: आता स्वस्तात करुन या नेपाळची सैर, पशुपतीनाथ यांच्या दर्शनाची मिळेल संधी!

56

प्रकल्प व्यवस्थापक यूपी सिंह म्हणाले, 'आम्ही जमिनीच्या पातळीपासून सुमारे 24 मीटर खाली 6 प्लॅटफॉर्म तयार करणार आहोत. स्थानकांमध्ये तीन स्तर आहेत ज्यात प्रत्येक स्तरावर स्थानक सुविधा, प्रवासी सुविधा आणि प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे." क्रेडिट कार्ड वापरता ना? मग कधीच करु नका 'या' 3 चुका, होऊ शकते नुकसान

66

त्यात दोन एंट्री आणि एग्जिट पॉइंट असतील, यामध्ये पॉइंट 2 बीवर जवळचे मेट्रो स्टेशन आणि दुसरा एमटीएनएल भवनकडे असेल. प्रवाशांच्या हालचालींसाठी पुरेशी जागा, कॉन्कोर्स आणि प्लॅटफॉर्म स्तरांवर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्टेशनची डिझाइन करण्यात आलीये.

  • FIRST PUBLISHED :